लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : राणी दुर्गावती स्मारक समिती, विर बिरसा मुंडा ग्रुप आपकारीटोला, मसरामटोला, कोहळीपार, पांढरवाणी व शेंडा येथील आदिवासी बांधवांच्या संयुक्त विद्यमाने शहीद विरांगणा राणी दुर्गावती दलपतशहा मडावी यांचा ४९३ वा जन्मोत्सव ठक्कर बाप्पा समाज मंदिराच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी पी.बी. सयाम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून टी.एस. सलामे (देवरी), मुख्याध्यापक एम.डी. बारसागडे, शिक्षक भरत मडावी, हरिश वाढीवे, प्रा. पी.आर. रामरकर, बावणकर, प्रा. पारधी, देशमुख, जगतराम मसराम, भोजराज मसराम, हेमराज वाढीवे, झाडूजी सिरसाम, आत्माराम मडावी, माजी दलाचे सरसेनापती तिजूराम टेकाम, जगदीश खंडाते, सुगन पुराम, गंगा मडावी, सुमी मडावी, सत्यभामा कुरसुंगे, जशुकला उईके, रजनी वाढीवे, अनिता मरस्कोल्हे, जसवंता पुराम, भागरता पंधरे, कल्पना चिचाम, धुरपता आचले, परसराम ईळपाते व उदाराम सराटे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महाराजा रावण, विरांगणा राणी दुर्गावती, शहदी विर बिरसा मुंडा, विर बाबुराव शेडमाके, महाराजा शंकर शाह यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व माल्यार्पण करण्यात आले.पोलीस पाटील रविता उईके यांनी दीप प्रज्वलन करुन कुपार लिंगो मैदानावरील गोंडीधर्म ध्वजाचे ध्वजारोहण गोपीचंद सिरसाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोंडी धर्माचे भूमका गेंदलाल, वरचो सुंदरीदंड व राधेशाम टेकाम गणूटोला यांनी पूजापाठ केली.यानंतर आदिवासी समाजाची दशा आणि दिशा या विषयावर मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. स्रेह भोजनानंतर गोंडी वेशभूषा, संस्कृती, रितीरिवाज गोंडी नृत्य, गोंडी धर्मावर आधारीत प्रश्न मंजुषा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये आश्रम शाळेचे विद्यार्थी रिता मरस्कोल्हे, प्रिया वरकडे, आरती सिरसाम, सीमा पंधरे, प्रतिज्ञा टेकाम, सिमला वाढीवे यांनी भाग घेतला. संचालन सामाजिक कार्यकर्ता पवन टेकाम, शिक्षक मधुकर टेकाम यांनी केले तर आभार बबलू सलामे यांनी मानले.
राणी दुर्गावती जन्मोत्सव थाटात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 9:49 PM