गोंदिया : भाजप शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कछवे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची मागणी केली. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्याची मागणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या अन्य समस्यांवरसुध्दा चर्चा केली.
कोरोनामुळे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तुर्तास करू नये, ३० जूनला निवृत्त होणाऱ्यांना जुुलैची वेतन वाढ देण्यात यावी, प्लानमधील शाळेतील शिक्षकांना दरमहा वेतन देण्यात यावे, तीन टक्के महागाई भत्त्याची रक्कम थकबाकी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, संत ज्ञानेश्वर विद्यालय, दतोरा शाळेतील शिक्षकांच्या वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन कछवे यांनी दिले. यावेळी अरुण पारधी, लिलेश्वर बोरकर, लक्ष्मण आंधळे, सनत मुरकुटे, सतीश मंत्री, चरणदास डहारे, मनोज येळे उपस्थित होते.