लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सतत तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून खामखुर्रा येथील तलाठी साझ्यांला कायम स्वरुपी तलाठी नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुरांची कामे खोळंबली आहेत. कोतवालाचे पद सुद्धा रिक्त आहे. तलाठी व कोतवालाचे रिक्त पद त्वरित भरावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व अर्जुनी मोरगावचे तहसीलदार यांच्यामार्फत पाठविले आहे.खामखुरा तलाठी सांझा क्रमांक १९ येथे ३ वर्षांपासून कायमस्वरुपी तलाठी नसल्याने अतिरिक्त कार्यभार मारगाये यांना दिला आहे. कोतवालाचे पद सुद्धा रिक्त आहे. या साझ्यांला ४ मोठमोठी गावे जोडली असून अतिरिक्त कामामुळे तलाठी वेळेवर मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याने भविष्यावर प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी, शेतमजुरांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे क्षेत्राकडे दुर्लक्ष पाहता खामखुरा येथे कायमस्वरुपी तलाठी द्यावे. कोतवालाचे रिक्त पद त्वरित भरावे असे निवेदन नायब तहसीलदार भानारकर मार्फत जिल्हाधिकारी गोंदिया, उपविभागीय अधिकारी अर्जुनी-मोरगाव यांना दिले.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निष्पल बरैय्या, उध्दव मेहेंदळे, संजय राऊत, ओमेश्वर संग्रामे, संतोष कोरडे, कैलास कास्कर, भाऊराव दुनेदार, मिलींद येलपुरे, सर्वेश धांडे, उध्दव मुंगमोळे, शरद मिसार, अशोक ठाकरे, रमेश मानकर, सुरेश दुनेदार उपस्थित होते.
तलाठ्यांचे रिक्त पद त्वरीत भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:50 PM
सतत तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून खामखुर्रा येथील तलाठी साझ्यांला कायम स्वरुपी तलाठी नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुरांची कामे खोळंबली आहेत. कोतवालाचे पद सुद्धा रिक्त आहे.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी: तहसीलदारांना निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा