लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : स्वत:च सिंचनाची सोय उपलब्ध करुन रब्बी हंगामात धानाचे पीक घेऊन दिवसरात्र राबणारा शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभा असल्याचे चित्र आहे. गरजेपोटी शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री करावी लागत आहे.तालुक्यात इडियाडोह जलाशयाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान लागवडीकरीता पाणी सोडण्यात आले नाही. तालुक्यात शेती हाच एकमेव व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेतामध्ये बोअरवेल खोदून सिंचनाची सोय केली. धानासाठी रब्बी हंगाम फायदेशीर ठरत असल्याने तालुक्यातील विभागातील शेतकऱ्यांनी पाण्याची सोय पाहून धानाची लागवड केली. पाण्याची सोय झाल्याने शेतकºयांनी रब्बी हंगाम वेळेनुसार केला. उन्हाळी धानाचे उत्पन्न आले. सध्या मोठ्या प्रमाणात मशिनद्वारे धानाची मळणी सुरू आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरीबांधव नियोजन करीत आहे. पैशाची जुळवा-जुळव करुन रब्बी हंगामाचे धान विक्रीसाठी शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांच्या दारापर्यंत जात आहे. मात्र अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची गळचेपी होत आहे.हमीभाव केंद्राचा अभावरब्बी हंगामातील धानाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात आले. शेतकरी धानाची विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दारात जात आहेत. परंतु शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र तालुक्यात अद्यापही सुरू झालेले नाही. शासनाचे निर्धारित केलेल्या हमीभावाने खाजगी व्यापारी धान खरेदी करित नाही. जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी सांगतात. मात्र ते अजूनही सुरू झाले नाही.व्यापाऱ्यांच्या दारासमोर ट्रॅक्टरची रांगरब्बी हंगामात पिकविलेला धान विकण्यासाठी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर भरुन तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एका व्यापाऱ्याच्या दारासमोर रस्त्याच्या रांग लावली आहे. १५३० रुपये प्रति क्व्ंिटल धान विकल्या जात असल्याची माहिती आहे.
रब्बी धान खासगी व्यापाऱ्याच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:21 AM
स्वत:च सिंचनाची सोय उपलब्ध करुन रब्बी हंगामात धानाचे पीक घेऊन दिवसरात्र राबणारा शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभा असल्याचे चित्र आहे. गरजेपोटी शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री करावी लागत आहे.
ठळक मुद्देहमीभाव केंद्राचा अभाव : जगाचा पोशिंदा संकटात