ऑनलाईन लोकमत गोंदिया : पादचारी उड्डाण पुलावरुन फलाटावर जाण्याऐवजी बरेच प्रवासी शार्टकटचा अवलंब करुन बेधडकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडून जातात. हा प्रकार गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. या धोकादायक प्रकाराकडे वांरवार रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.रॅम्पवरून चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी रेल्वेच्या पादचारी पुलाचा वापर टाळून प्रवासी बेधडकपणे ट्रॅक ओलांडून एका फलाटावरून दुसºया फलाटावर जाण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा गाडी ट्रॅकवर आल्यावर देखील प्रवासी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे ज्यावेळी गाडी ट्रॅकवर येते तेव्हा तिथे रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित असतात. हा सर्व जीवघेणा प्रकार त्यांच्या डोळ्यादेखत दररोज घडत असताना अद्यापही या प्रकाराला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे रेल्वे विभाग सुरक्षाविषयक उपाय योजना राबविण्यात कितपत सजग आहे, हे दिसून येते.सकाळी सर्वाधिक धोकाहावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेच्यावर प्रवाशी आणि मालगाड्या धावतात. महाराष्टÑ एक्सप्रेस, गोंदिया-बल्हारशा, गोंदिया-बालाघाट या गाड्या होम फलाटावरुन सुटतात. बरेचदा या गाड्या सुटत असताना प्रवाशी ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. तसेच फलाट क्रमांक वरील पादचारी उड्डाणपुल फारच अरुंद असल्याने या पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे शेकडो प्रवाशी पादचारी पुलांवरुन जाण्याऐवजी ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार प्रामुख्याने सकाळच्या वेळेत सर्वाधिक दिसून येतो.तिरोडा रेल्वे स्थानकावर समस्यातिरोडा रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसºया प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी बेलाटी गावाच्या दिशेने बुकिंग आॅफिसजवळ जुने पूल आहे. परंतु तिरोडा शहरातून येणारे प्रवासी या पुलाचा उपयोग खूपच कमी करतात. ते सरळ मालगोदामाजवळील पायवाटेने रेल्वे मार्ग ओलांडून प्लॅटफॉर्म-१ वर जातात. तर प्लॅटफॉर्म-१ वर उतरलेले प्रवासी शहरात जाण्यासाठी पुन्हा रेल्वे ट्रॅक ओलांडून याच पायवाटेने शहराकडे जातात. या प्रकारामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे.सुविधांकडे कानाडोळागोंदिया रेल्वे स्थानकाचा विकास झपाट्याने होत आहे. शिवाय दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे हे स्थानक असून येथून प्रवास करण्याºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. येथे ट्रॅक ओलांडताना अनेक अपघात घडले आहेत. हा प्रकार बंद व्हावा यासाठी स्थानकावर विविध सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. प्लॅटफॉर्म-५ व ६ साठी रॅम्प तयार करण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म-२ साठी रॅम्पचे बांधकाम सुरू आहे. तसेच ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी होमप्लॅटफॉर्मवर व प्लॅटफॉर्म-३ तथा ४ वर लिफ्टची सोय करण्यात आली आहे. तसेच होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.कर्मचाऱ्यांचा अभावयाबाबत रेल्वेचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, गोंदिया रेल्वे स्थानकात मनुष्यबळाचा अभाव आहे. स्थानकात थोड्याथोड्या वेळाने प्रवासी गाड्यांचे आगमन होते. गुन्हेगारी किंवा चोरीसारख्या घटना घडत असल्याने रेल्वे पोलीस किंवा जीआरपीचे कर्मचारी तिकडे जातात. अशावेळी प्रत्येक गाडीच्या आगमनाप्रसंगी प्रवाशांच्या कृत्यांवर लक्ष ठेवणे कठिण असते. शिवाय रेल्वे नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी तशी उद्घोषणा केली जाते. तरीही प्रवाशांवर प्रभाव पडत नसेल तर हा त्यांचा स्वत:चा दोष आहे.उद्घोषणेकडे प्रवाशांचे दुर्लक्षरेल्वे नियमांचे उल्लंघन होवू नये, रॅम्प व पादचारी पुलाचा वापर व्हावा. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रॉनिक उद्घोषणा वारंवार केली जाते. परंतु काही प्रवासी लवकरच स्थानकाबाहेर पडण्यासाठी या उद्घोषणेकडे दुर्लक्ष करतात व ट्रॅक ओलांडण्याचा प्रकार घडतो. मजिस्ट्रेट चेकिंगदरम्यान रेल्वे पोलीस किंवा जीआरपीचे कर्मचारी अशा प्रवाशांना पकडतात. मात्र त्यानंतर रेल्वे विभाग याकडे दुुर्लक्ष करते. त्यामुळे हा प्रकार अजुनही सुरूच आहे.
रेल्वेला अपघाताची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:10 AM
पादचारी उड्डाण पुलावरुन फलाटावर जाण्याऐवजी बरेच प्रवासी शार्टकटचा अवलंब करुन बेधडकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडून जातात. हा प्रकार गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसांपासून सुरूच आहे.
ठळक मुद्देबेधडकपणे ट्रॅक ओलांडणे सुरूच : कारवाईकडे दुर्लक्ष