लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील सुमारे २० दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतून आला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने सोमवारी (दि.६) हजेरी लावली. या पावसामुळे सर्वच सुखावले असून जोरदार पावसाची वाट बघत आहेत.जिल्ह्यात चांगलाच कहर केल्यानंतर मागील सुमारे २० दिवसांपासून पाऊस पाठ फिरवून बसला होता. पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. विशेष म्हणजे, रोवणी अडकून पडली असतानाच झालेली रोवणी धोक्यात आली आहे. पावसाअभावी शेतीला आता भेगा गेल्याचेही दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत अडकला आहे. शिवाय पावसाअभावी उकाडा वाढला आहे.अशातच मात्र सोमवारी (दि.६) दुपारी पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. काही काळच बसरलेल्या या पावसाने सर्वच सुखावले आहेत. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उद्या व परवा मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पाऊस परतून आला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:07 PM
मागील सुमारे २० दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतून आला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने सोमवारी (दि.६) हजेरी लावली. या पावसामुळे सर्वच सुखावले असून जोरदार पावसाची वाट बघत आहेत.
ठळक मुद्देकाही तालुक्यांत हजेरी : हलक्या व मध्यम पावसाची शक्यता