शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
4
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
5
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
6
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
8
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
9
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
10
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
11
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
12
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
13
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
14
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
15
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
16
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
17
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
18
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
19
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला चॅम्पियन; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
20
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा

निवडणूक प्रचारात पावसाचा व्यत्यय

By admin | Published: June 20, 2015 1:34 AM

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल झाल्यानंतर अनेकांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे.

उमेदवारांची तारांबळ : शेतकरी कामात व्यस्तगोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल झाल्यानंतर अनेकांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे. परंतू गेल्या चार दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना प्रचारात मोठी अडचण जात आहे.संगणकाच्या युगात आज मोठ्या प्रमाणत सोशल मिडियाचा वापर होताना दिसत आहे. काळानुरुप प्रत्येकाला बदल स्विकारावा लागत आहे. येत्या ३० जून रोजी मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे पहिल्यांदाच उमेदवारांकडून जिल्हा परिषद विभाग आणि पंचायत समित्यांच्या निवडणुक गणासाठी निवडणूक आयोगाने आॅनलाईन अर्ज मागविले आहे. उमेदवारांनी देखील आॅनलाईन नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७७५ नामनिर्देशन पत्रे आॅनलाईन भरुन उमेदवारांनी सहकार्य केले.जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी उमेदवारांनी ४५७ व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी ६५३ असे एकूण १११० नामनिर्देशन पत्रे भरली. यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी ३३० व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी ४४५ असे एकूण ७७५ नामनिर्देशन पत्रे उमेदवारांनी आॅनलाईन भरली. आॅफलाईन नामनिर्देशन पत्राची संख्या जि.प. निवडणूक विभागासाठी १२७ व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी २०८ अशी एकूण ३३५ इतकी आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आॅनलाईन नामनिर्देशन पत्रे सादर करुन संगणक युगात आपण सुद्धा असल्याची प्रचिती दिली आहे.गोंदिया जिल्ह्याची ओळख जरी मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून असला तरी मिनी मंत्रालयात लोकप्रतिनिधी म्हणून प्रवेश करण्यास इच्छुक उमेदवारांनी आॅनलाईन नामनिर्देशन पत्रे सादर करण्याच्या पद्धतीचा स्विकार करीत आपण सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे सिद्ध केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)