शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

पाऊस तळ ठोकून

By admin | Published: June 22, 2015 12:35 AM

मागील आठ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे.

शनिवारपासून संततधार : शेतीच्या कामांना आला वेग गोंदिया : मागील आठ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे. त्यात शनिवारपासून (दि.२०) संततधार बरसत असलेल्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. संततधार पावसामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत. रविवारी (दि.२१) सकाळपर्यंत आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात अतिवृष्टीची माहिती आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३५३२.२ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मृगाची सुरूवात कोरडी झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पाऊस दडी मारणार या भितीने शेतकऱ्यांच्या माथ्यावर चिंतेचे सावट दिसून येत होते. यामुळेच शेतीची कामे बंद पडली होती. मात्र मागील रविवारपासून (दि.१४) पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे. दिवसभर उघाड राहिल्यानंतर दररोज सायंकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने सर्वच सुखावले आहे. पावसाचे हे सुखावह आगमन होत असल्याने शेतकऱ्यांनी कंबर कसून शेतीच्या कामांत हात घातला आहे. मात्र शनिवारच्या (दि.२०) दुपारपासून संततधार पावसाने हजेरी लावली असून अवघ्या जिल्ह्याला झोडपून काढले आहे. प्राप्त माहितीनुसार, १ ते २१ जून पर्यंत जिल्ह्यात ३५३२.२ मीमी. पाऊस पडला आहे. त्याची सरासरी १७ मीमी. आहे. विशेष म्हणजे आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात सर्वाधिक ७६.८ मीमी. एवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या संततधार पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला असतानाच मात्र सर्वसामान्यांची कामे अडकल्याचेही दिसून आले. पावसामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता व नागरिकांना घराबाहेर पडणे कठिण झाले. शहरातील झोपडी मोहल्यात तर मोठ्याप्रमाणात पाणी शिरल्याचेही दिसून आले. (शहर प्रतिनिधी)प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांत पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, इटियाडोह प्रकल्पात ९०.४ दलघमी म्हणजेच ८.३० टक्के जलसाठा, सिरपूर प्रकल्पात २१.२२ दलघमी म्हणजेच ६.२० टक्के जलसाठा, पूजारीटोला प्रकल्पात ६.५२ दलघमी व कालीसराड प्रकल्पात १.०६ दलघमी जलसाठा आहे.