लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला. पावसाचा जोर सोमवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत होते. तर तिरोडा, गोरेगाव तालुक्यातील काही नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन चार तास ठप्प होती. पुलावरील पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. तर संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ३६३ घरे आणि गोठ्यांची पडझड होवून नुकसान झाले.जिल्ह्यात मागील चौवीस तासात गोरेगाव, तिरोडा, आमगाव, गोरेगाव या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण ६८.४५ मि.मी.पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन काही प्रमाणात प्रभावित झाले होते. गोरेगाव तालुक्यातील देवूटोला (म्हसगाव) येथील भोलाराम शेंद्रे यांच्या गोठ्यावर रविवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास वीज कोसळून सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. त्यामुळे सदर शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका काही शेतकऱ्यांना बसला.पावसामुळे काही शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेली तर काहींचे धानाचे पऱ्हे वाहून गेले. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यात मागील चौवीस तासात ६८.४५ मि.मी.पावसाची नोंद झाली. दमदार पावसामुळे दिलासा मिळाला.१५ महसूल मंडळात सर्वाधिक पावसाची नोंदजिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे १५ महसूल मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रतनारा, रावणवाडी, गोंदिया, खमारी, गोरेगाव, कुऱ्हाडी, मोहाडी, परसवाडा, तिरोडा, वडेगाव, ठाणेगाव, कट्टीपार, आमगाव, तिगाव, ठाणा महसूल मंडळाचा समावेश आहे.नुकसानीचे सर्वेक्षण सुरूजिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ३६३ घरांची पडझड झाली. तर काही वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तर शेताच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला दिले आहेत.परिसरातील वाहतूक ठप्पसुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यात सोमवारी (दि.१६) पहाटे ४ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सुकडी डाकराम परिसरातील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास ठप्प झाली होती. खडकी डोंगरगाव येथील मिसखदान तलाव ओवरफ्लो झाला. या तलावातून दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. बुचाटोलाच्या नाल्याला पूर आल्यामुळे बुचाटोला, पिंडकेपार, सुकडी वाहतूक ४ तास ठप्प होती. बुचाटोला ते डोंगरगाव-खडकी नाल्यावरुन तीन फूट पाणी वाहत असून चार तास वाहतूक बंद होती. इंदोरा-निमगाव ते बरबसपुरा रस्त्यावरच्या इंदोरा खुर्द नाल्यावरुन पाच ते सहा फूट पाणी वाहत होते. त्यामुळे शाळकरी मुले व कर्मचाºयांची कोंडी झाली. गोरेगाव-तिरोडा मार्गावर मंगेझरी, कोडेबर्रा, सिंगार चौकी नाला, खडखड्या नाल्याला पूर आला असून तिरोडा-गोरेगाव बस सकाळी पाळीची बस गोरेगाववरुन आलीच नाही. गोरेगाव व तिरोडा मार्ग बोदलकसाकडे जाणाऱ्यांची फजीती झाली.सकाळी ९ वाजतानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.दमदार पावसाने बळीराजा सुखावलासडक-अर्जुनी : मागील पाच सहा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी (दि.१५) रात्रीपासून तालुक्यात दमदार हजेरी लावली.सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते तर शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याने रोवणीच्या कामाला वेग आला असून बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. पावसामुळे तालुक्यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. मात्र पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे नायब तहसीलदार बी.आर.मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखालीगोरेगाव : तालुक्यात रविवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास झालेल्या दमदार पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले तर अनेकांच्या घरात पाणी शिरले. रात्रभर आलेल्या संततधार पावसामुळे गोरेगावातील काही वार्डात पाणी साचल्याचे चित्र होते. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यातील म्हसगाव येथील पांगोली नदीच्या दोन्ही पुलावरुन पाच ते सहा फूट पाणी वाहत होते. या परिसरातील पाच-सहा एकर जमीन पाण्याखाली असल्याचा अंदाज आहे. म्हसगाववरुन तेढा-आंबेतलाव रस्ता पुरामुळे बंद झाल्यामुळे प्रवाशांना आल्यापावलीच परतावे लागले. गोरेगाव शहरातील पाण्याचा निचरा झाल्याने काही वार्डात पाणी साचले होते. पावसाने अनेक ठिकाणी पावसाचा निचरा होत नव्हता. वेळीच नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी जेसीबी व कामगार लावून वार्डावार्डातील नाल्यांची सफाई केली.
जिल्ह्यात पावसाची संततधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 10:03 PM
मागील पंधरा दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला. पावसाचा जोर सोमवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत होते.
ठळक मुद्दे३६३ घरांची पडझडचार तालुक्यात अतिवृष्टीकाही मार्गावरील वाहतूक तीन-चार तास ठप्प