लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारच्या अत्याधिक आरक्षण देण्याच्या धोरणाचा मेरिट बचाओ राष्ट्र बचाव समितीने याला विरोध केला आहे. आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्केच ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८ ) सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरुन फिरुन पुन्हा इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे पोहचली.या रॅलीमध्ये युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. हातात फलक घेवून आरक्षण वाढीचा विरोध केला. सरकारने आरक्षणात वाढ केल्याने देशातील खुल्या प्रवर्गातील अनेक प्रतिभावंत युवकांना त्यांची योग्यता असतांनासुध्दा नोकरी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सर्वच प्रवर्गांमध्ये गरीब आणि मागासलेपण आहे, मग आरक्षण हे विशिष्ट समाजासाठीच का असा सवाल सुध्दा रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी केला.मेरिट बचाओ राष्ट्र बचाओ अभियान सर्वच धर्मियांचे असून यात कुठल्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही. कुठल्या जाती धर्माचा विरोध करणे हा या अभियानाचा हेतू नाही. मात्र राष्ट्रहितासाठी मेरिटला योग्य स्थान मिळावे हा या मागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. या रॅलीचे नेतृत्त्व गोविंद अग्रवाल, डॉ.राजेंद्र जैन, अपूर्व अग्रवाल, साजन वाधवानी, महेश आहूजा, सीताराम अग्रवाल, आदींनी केले.
गोंदियात आरक्षण वाढीच्या निषेधार्थ रॅली ; हजारो नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:27 PM
राज्य सरकारच्या अत्याधिक आरक्षण देण्याच्या धोरणाचा मेरिट बचाओ राष्ट्र बचाव समितीने याला विरोध केला आहे. आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्केच ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८ ) सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली.
ठळक मुद्देमेरिट बचाव राष्ट्र बचाव समितीचे आयोजन