अध्यक्षस्थानी संस्थापक जगदीश लोहिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष आ. न. घाटबांधे, अध्यक्ष प्रभूदयाल लोहिया, सदस्य पंकज लोहिया, सरपंच गायत्री इरले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रूपाली टेंभुर्णे, पंचायत समितीच्या माजी सदस्य मंजू डोंगरवार, पर्यवेक्षिका कल्पना काळे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापिका सयुक्ता जोशी उपस्थित होत्या.
याप्रसंगी जगदीश लोहिया यांनी, भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व असून, भारतीय संस्कृतीतच जगाचे रक्षण व नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे मार्गदर्शन केले. पाहुण्यांनीही गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण प्राप्त करणारा अर्णव विनोद इरले व ९७.४० टक्के गुण प्राप्त करणारी कलिका दिघोरे तसेच ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला.
संचालन यू.बी. डोये यांनी केले. आभार प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्था, शाळा समिती, शाळा सुधार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक समितीचे पदाधिकारी व सदस्य, पालक, गावकरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.