शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

आमदारांच्या शिफारशीवरुन त्या संस्थेला पुन्हा मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 5:00 AM

विशेष म्हणजे मार्केटिंग फेडरेशनने सालेकसा सहकारी भात गिरणीला पुन्हा परवाना बहाल करण्यासाठी दिलेली कारणे देखील तेवढीच मजेदार आहेत. काहींनी केवळ राजकीय आकसापोटी या संस्थेविरुध्द तक्रार केल्याचे आमदारांनी तपासणी आणि खातरजमा केल्यानंतर स्पष्ट झाले.  त्यामुळेच आमदारांनीच या केंद्राला पुर्ववत करण्याची शिफारस केल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनचा अहवाल : घोळामुळे कसेलच नुकसान नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  धान खरेदीत घोळ केल्याप्रकरणी महिनाभरापूर्वी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सालेकसा येथील सालेकसा सहकारी भात गिरणीचा परवाना ९ नाेव्हेंबरला रद्द केला होता. मात्र याला महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच आमदारांच्या शिफारशीवरुन परवाना बहाल करीत असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अहवालात म्हटले आहे. तर खरेदीतील घोळामुळे मार्केटिंग फेडरेशनचे कसलेच नुकसान झाले नसल्याचे या अहवालात नमूद केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील वर्षी खरीप रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी करण्यात आलेल्या धान खरेदीत घोळ झाला होता. हे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशी समितीने केलेल्या चौकशीत सुध्दा हे स्पष्ट झाले होते. याच अहवालाच्या आधारावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सालेकसा, गोरेगाव आणि सालेकसा येथील एकूण पाच संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचा धान खरेदीचा परवाना ९ ऑक्टोबरच्या पत्राअन्वये रद्द केला होता. मात्र या सर्व गोष्टीला महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच याच चौकशी अहवालातील गंभीर बाबी अचानक शिथील झाल्या आहे. विशेष म्हणजे मार्केटिंग फेडरेशनने सालेकसा सहकारी भात गिरणीला पुन्हा परवाना बहाल करण्यासाठी दिलेली कारणे देखील तेवढीच मजेदार आहेत. काहींनी केवळ राजकीय आकसापोटी या संस्थेविरुध्द तक्रार केल्याचे आमदारांनी तपासणी आणि खातरजमा केल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळेच आमदारांनीच या केंद्राला पुर्ववत करण्याची शिफारस केल्याचे म्हटले आहे. तर संस्थेच्या खरेदी केंद्रावर ठरवून दिलेल्या हेक्टरी मर्यादापेक्षा अधिक प्रमाणात धान खरेदी करणे ही बाब नियमभंग करणारी असली तरी सालेकसा तालुका कृषी अधिकारी यांनी प्रति हेक्टरी ४१ क्विंटल धानाचे उत्पादन झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे ही बाब सुध्दा गंभीर नसल्याचे म्हटले आहे. त्रिस्तरीय चौकशी समितीने धान खरेदीत घोळ झाल्याचे म्हटले असले तरी यामुळे शासनाचे अथवा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे कसलेच नुकसान झालेले नाही. तर संस्थेने खरेदी केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधी व मंत्री यांच्याकडे केलेली मागणी आणि त्यांनी दिलेल्या आदेशावरुन या संस्थेला पुन्हा धान खरेदीची परवानगी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ५० हजार रुपयांचा दंड आकारुन व संस्थेकडून शपथपत्र लिहून घेवून पुन्हा गैरप्रकार झाल्यास कायमस्वरुपी परवाना रद्द करण्यात येईल अशी ताकीद देऊन पुन्हा मंजुरी देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल मार्केटिंग फेडरेशनने दिलेली मंजुरी यात नेमके काय तथ्य आहे स्पष्ट झाले आहे.

धानातील तफावत बदलली घटीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने सालेकसा येथील सालेकसा सहकारी भात गिरणीची चौकशी केली असता त्यात खरेदी केलेल्या धानापेक्षा प्रत्यक्षात धान कमी आढळल्याचा ठपका ठेवला होता. मात्र आता ही धानाची तफावत आता घटीमध्ये बदल केला आहे. तसेच धानातील घटीची रक्कम संस्थेकडून वसूल करावी असे अहवालात म्हटले आहे. 

खरेदीतील अनियमिततेला कसा बसणार चाप  शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, त्यांची धान खरेदी केंद्रावर कुठलीही दिशाभूल होवू नये यासाठी लोकप्रतिनिधी व मंत्री निर्देश देत आहे. मात्र दुसरीकडे धान खरेदीतील घोळावर पांघारुन घातले जात आहे. त्यामुळे धान खरेदीतील अनियमिततेला चाप कसा बसणार आणि शेतकऱ्यांचे हित कसे साधले जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :MarketबाजारMarket Yardमार्केट यार्ड