शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

विद्यार्थ्यांनी फोडली समाजातील समस्यांना वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 9:53 PM

आपल्या बाजुला दररोज विविध घटना घडतात. बºयाच समस्या आपल्या लक्षात येवून त्या आपल्याला मांडता येत नाही.

ठळक मुद्देलेखणीतून मांडली मते : लोकमतचा उपक्रमबालकदिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या बाजुला दररोज विविध घटना घडतात. बºयाच समस्या आपल्या लक्षात येवून त्या आपल्याला मांडता येत नाही. यासर्व घडामोंडीविषयी विद्यार्थ्यांना सुध्दा अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांवर व्यक्त होण्याची व त्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्याचा त्यांचा मानस असतो. मात्र त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. लोकमतने बालक दिनाचे औचित्त्य साधून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची व स्वत:च्या लेखणीनतून मते मांडण्याची संधी उपलब्ध करुन दिली. यावेळी शारदा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.१३) लोकमत जिल्हा कार्यालयाला भेट देऊन तिथे चालणाºया कामकाजाची माहिती घेतली. तसेच स्वत: बातमीदाराची भूमिका पार पाडून काही बातम्या संपादित केल्या. बालकदिनाच्या पूर्व संध्येला लोकमतने उपलब्ध करुन दिलेल्या या संधीबद्दल विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले. यावेळी शारदा कॉन्व्हेंटचे चित्रेश भेलावे, वलय बिसेन, जय लांजेवार, नेहा चव्हाण, श्वेता कोंटागले, भूमिका लारोकर, आशुतोष अवस्थी, वेदी बिसेन व शिक्षक पी.ए.फुंडे व व्ही.ए.खोब्रागडे उपस्थित होते.वृक्षारोपण करुन करा पर्यावरणाचे संवर्धन-वेदी बिसेनवाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. शहरातील हिरवळ देखील नष्ट होत चालली आहे. त्याचे गंभीर परिणाम पर्यावरण होत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. झाडांमुळे आपल्या प्राणवायु मिळतो. शिवाय कार्बन डायआॅक्साइड व कार्बन मोनआॅक्साइडचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. पर्यावरणाच्या ºहासामुळे दिल्लीत प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. तेथील लोकांना मास्क लावून फिरण्याची वेळ आली आहे. ही वेळ गोंदियातील नागरिकांवर येऊ नये, यासाठी सर्वांनी आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांनी किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे.अंधश्रद्धेला नका घालू खतपाणी -नेहा चव्हाणआपली आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असली तरी अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात अनिष्ठ रुढी पंरपरा कायम आहेत. यामुळे अनेकदा समाजात तेढ निर्माण होतो. त्यामुळे वैज्ञानिक युगात अंधश्रध्देला खतपाणी न घालता लोकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प बालकदिनी विद्यार्थ्यांनी करावा. अंधश्रध्देला खत पाणी न मिळाल्यास समाजात एकोपा वाढविण्यास मदत होईल. रस्त्यावर भटकंती करणारे व बालमजुरी करणाºया मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा विकास साधवा. या बालकदिनी विद्यार्थ्यांनी समाजातून अनिष्ठ रूढी पंरपरा नष्ट करुन एका समृध्द समाजाची निर्मिती करावी.विद्यार्थ्यांना मिळावे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन- भूमिका लारोकरआजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. युवकांना पुढे जाण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र नेमका याच गोष्टीचा सध्या अभाव आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेविषयक मार्गदर्शन केंद्र उघडण्यात यावे. विद्याथी व युवकांना चालू घडामोंडीची माहिती देऊन त्यांनी कुठल्या क्षेत्राची व अभ्यासक्रमाची निवड करावी, तसेच कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. यादृष्टीने मार्गदर्शन मिळाल्यास आदर्श समाजाची निर्मिती करण्यास मदत होईल.वाढत्या अपघातांना लावा प्रतिबंध- आशुतोष अवस्थीअलीकडे अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापैकी बरेच अपघात हे वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्याने घडलेले आहेत. वाढत्या अपघातांच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी वेळीच उपाय योजना राबविण्याची गरज आहे. बालकदिनी विद्यार्थ्यांनी लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा संकल्प करावा. तसेच अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये असे आवाहन पालकांना करावे.