शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

रीडर व लाईनस्टाफला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:20 PM

वीज ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आपल्या कामात कसूर करणाºया मीटर रीडर तसेच ग्राहकांना सेवा देण्यात विलंब करणाºया लाईनस्टाफला वीज वितरण कंपनीने चांगलाच दणका दिला आहे.

ठळक मुद्देमहावितरणची कारवाई : वीज ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आपल्या कामात कसूर करणाºया मीटर रीडर तसेच ग्राहकांना सेवा देण्यात विलंब करणाºया लाईनस्टाफला वीज वितरण कंपनीने चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईनंतर भविष्यात कुणीही ग्राहकांना सेवा देण्यात विलंब करू नये हा या मागचा महावितरणचा उद्देश आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे मात्र मीटर रीडर व लाईनस्टाफचे धाबे दणाणले आहेत.वीज वितरण कंपनीशी घेऊन ग्राहकांच्या नानाविध समस्या व तक्रारी असतात. ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी वर्गाकडून लगेच पाऊल उचलले जात असले तरीही कित्येकदा लाईनस्टाफ ग्राहकांना सेवा देण्यात विलंब करतात. यामुळे ग्राहकांचा वीज वितरण कंपनीप्रती असलेला दृष्टिकोन बदलत जातो. शिवाय वीज वितरण कंपनी ग्राहकांना त्रास देत असल्याचे बोलले जाते. ग्राहकांच्या या समस्या व तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून तक्रार निवारण शिबिरांचे आयोजनही केले जात आहे. मात्र त्यात वीज मीटर रीडिंग व लाईनस्टाफशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे कठीण असते.मीटर रीडर व लाईनस्टाफ यांचा वीज ग्राहकांशी संबंध येत असून त्यांच्याच माध्यमातून वीज ग्राहकांच्या समस्या व तक्रारी सोडविता येतात. यामुळे वीज वितरण कंपनीने मीटर रीडर व लाईनस्टाफवर आपले लक्ष केंद्रीत केले.यात असे आढळून आले की, रीडिंच्या बाबतीत काही रिडर आपल्या कामात कसूर करीत आहेत. रीडर कित्येकदा ग्राहकांच्या मिटरचे रीडिंग न घेताच आपल्या मर्जीने रीडिंग टाकत आहेत.यात एकतर ग्राहकांचे रीडिंग वाढल्यास ग्राहकांना जास्त बील येते. रीडिंग कमी टाकल्यास वीज कंपनीला त्याचा फटका बसतो. यामुळे आता वीज वितरण कंपनीने अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार केले असून त्यात मीटर रीडर काय करतात हे सर्व जाणता येते.यातूनच मीटर रीडिंग घेण्याच्या कामात कसूर करणाºया ६ मीटर रिडरवर कारवाई करण्यात आली असून त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. शिवाय ग्राहकांना सेवा देण्यात विलंब करणाºया १७ लाईनस्टाफवरही वीज वितरण कंपनीने दणका दिला आहे. वीज ग्राहकांच्या समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी तसेच भविष्यात मीटर रीडर व लाईनस्टाफकडून अशी चूक होऊ नये यासाठी महावितरणने हे कठोर पाऊल उचलले आहे. शिवाय असे प्रकार आढळून आल्यास त्यांचीही गय केली जाणार नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.रीडरला राज्यात कुठेही काम करता येणार नाहीवीज वितरण कंपनीने केलेल्या कारवाईमुळे मीटर रीडरला राज्यात कोठेही काम करता येणार नाही. त्याचे असे की, जिल्ह्यात मीटर रीडिंगचे काम करण्यासाठी गोंदिया विभागात दोन व देवरी विभागात चार एसंजी कार्यरत आहेत. या एजंसीकडून हे मीटर रीडर कामावर ठेवले जात असून वीज वितरण कंपनीने रीडरला त्यांच्या आधारकार्ड क्रमांकवरून एक कोड दिला आहे. हा कोड महावितरणक डे असून कारवाई करण्यात आलेला रिडर राज्यात कोठेही रीडिंगच्या कामासाठी गेल्यास त्याच्या आधारकार्ड क्रमांकावर महावितरणने त्याला दिलेला कोड ट्रेस होणार आहे. त्यामुळे आता या सहा रीडरला राज्यात कोठेही मीटर रीडिंगचे काम करता येणार नाही. कारवाई करण्यात आलेल्या या सहा रीडरमधील चार अंजली लॉजीस्टिकचे चार तर संदीप क्रियेशनचे दोन रीडर आहेत.लाईनस्टाफचा घरभाडे भत्ता थांबविलारीडरवर करण्यात आलेल्या कारवाई सोबतच महावितरणने येथील १७ लाईनस्टाफवरही कारवाई केली आहे. यात गोंदिया विभागातील १० तर देवरी विभागातील सात लाईनस्टाफ कर्मचारी आहेत. कंपनीने या कर्मचाºयांचा घरभाडे भत्ता थांबविला आहे. शिवाय असले प्रकार आढळून आल्यास अशाच प्रकारच्या कारवाया केल्या जातील असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.दोन हजार मीटर आलेकित्येकदा मीटरमध्ये बिघाड आल्यानेही ग्राहकांना जास्तीचे बील जाते. यामुळे बिघाड झालेले मीटर बदलविले जात असून यासाठी महावितरणकडे दोन हजार नवीन मीटर आले आहेत. यातील १ हजार २०० मीटर गोंदिया विभागासाठी व ८०० मीटर देवरी विभागासाठी देण्यात आले आहेत. यातून फॉल्टी मीटर बदलविण्याचे काम सुरू असून आणखीही मीटरची मागणी करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता लिलाधर बोरीकर यांनी सांगितले.