शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

२३ लाख पुस्तकांतून ‘वाचन प्रेरणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 9:15 PM

दप्तरविरहित दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरुवात केली. हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रात राबविण्यात आला. १५ आॅक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते.

ठळक मुद्दे१६३३ शाळा सहभागी : २ लाख २८ हजार विद्यार्थ्यांचा वाचन आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दप्तरविरहित दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरुवात केली. हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रात राबविण्यात आला. १५ आॅक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते.यात यंदा जिल्ह्यातील २ लाख २८ हजार १९२ विद्यार्थ्यांनी २३ लाख पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले. जिल्ह्यात सुरूवात करण्यात आलेल्या वाचन आनंद दिन कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती (१५ आॅक्टोबर) वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले.त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातील १६३३ शाळेत हा दिवस साजरा करण्यात आला. यात २ लाख २८ हजार २९२ विद्यार्थ्यांनी २३ लाख पुस्तकांचे वाचन केले. यांतर्गत, एका विद्यार्थ्याने किमान १० पुस्तकांचे वाचन केले आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी व सदर दिवशी दप्तरमुक्त व हातधूवा दिवस सर्व शाळांमध्ये राबविण्यात आला आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने सरासरी १० पुस्तकांचे वाचन करण्यासाठी शाळांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली होती. काही शाळांमध्ये टॅब व संगणकाद्वारे आॅनलाईन पद्धतीने अधिकृत पुस्तक अ‍ॅप्स उपलब्ध करुन पुस्तकांचे वाचन करण्यात आले. जेथे पुस्तके कमी जाण्याची शक्यता होती त्या ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय, शिक्षणप्रेमी, युवक मंडळे, शिक्षक यांच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करण्यात आली.जिल्ह्यात १५ आॅक्टोबर रोजी सर्व शाळांमध्ये सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते व नियोजनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० (१६ पुष्ठे) पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना नियोजनाप्रमाणे सहकार्य केले.गोंदियात ७७ हजार विद्यार्थ्यांनी केले वाचनअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१२ शाळांतील २७ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी वाचन केले. आमगाव तालुक्यातील १५९ शाळांतील २२ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी वाचन केले. देवरी तालुक्यातील २०० शाळांतील १९ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी वाचन केले. गोंदिया तालुक्यातील ४०८ शाळांतील ७७ हजार ७११ विद्यार्थ्यांनी वाचन केले. गोरेगाव तालुक्यातील १५८ शाळांतील १८ हजार ११७ विद्यार्थ्यांनी वाचन केले. सालेकसा तालुक्यातील १४८ शाळांतील १६ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी वाचन केले. सडक-अर्जुनी तालुक्यातील १५४ शाळांतील १७ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी वाचन केले. तिरोडा तालुक्यातील १९४ शाळांतील २८ हजार ७६ विद्यार्थ्यांनी वाचन केले.

टॅग्स :APJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम