शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
4
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
5
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
6
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
7
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
8
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
9
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
10
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
11
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
12
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
13
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
14
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
15
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
16
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
17
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
18
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

हाजरा फॉलवर युवक झाले सज्ज

By admin | Published: June 20, 2015 1:40 AM

तालुका मुख्यालयापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळ ‘हाजरा फॉल’ ...

विजय मानकर सालेकसा तालुका मुख्यालयापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळ ‘हाजरा फॉल’ धबधबा परिसराचा हळूहळू चेहरामोहरा बदलत चालला आहे. आता दूरदूरवरुन येणाऱ्या हौसी पर्यटकांसाठी हे सुरक्षित पर्यटन स्थळ ठरत आहे. येथील वन व्यवस्थापन समितीच्या युवकांनी या स्थळाला आपल्या उर्जेचा योग्य उपयोग करून देत अनुकूल ठरविण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करीत आहेत. आता पावसाळा लागला असून एकदा जर दमदार पाऊस आला की हाजरा फॉल धबधब्यावरुन पाणी पडण्यास सुरुवात होईल आणि या परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या स्थळाकडे आकर्षित होतील. त्या सर्वांच्या सेवेसाठी तसेच सुरक्षिततेसाठी युवक सज्ज झाले आहेत. फक्त आता एका दमदार पावसाच्या हजेरीची प्रतीक्षा आहे.गोंदिया जिल्ह्याला लाभलेल्या घनदाट जंगलात पूर्वी सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत असलेले नैसर्गिक पर्यटनस्थळ हाजरा फॉल मनात नवचेतना निर्माण करणारा असल्याने दूरदूरच्या पर्यटकांना आपल्याकडे खेचत असतो. मात्र त्याचबरोबर पर्यटकांवर आपले जीवसुद्धा गमविण्याची पाळी येते. त्यामुळे हाजरा फॉल हे एक जीव घेणारे पर्यटन स्थळ आहे, अशी कुप्रसिद्धीसुद्धा हाजरा फॉलबद्दल पसरली होती. लोकमतने वेळोवेळी या स्थळाची विस्तृत माहिती देत येथील अपघात टाळणे, विकास करणे व सौंदर्यात कसे भर पाडता येईल त्याचबरोबर अनर्थ होण्यामागची कारणे इत्यादीबद्दल बातम्या व लेख प्रकाशित करीत शासनाला तसेच लोकप्रतिनिधींच्या निदर्शनात आणून देण्याचे काम करीत महत्वाची भूमिका बजावली. वर्षानुवर्षे या स्थळाकडे दुर्लक्ष झाले. शेवटी मागील वर्षी सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये जिल्ह्याचे प्रादेशिक उपवन अधिकारी जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात नवाटोला क्षेत्राचे वनरक्षक सुरेश रहांगडाले यांच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला (सालेकसा) येथील युवकांनी हाजरा फॉल परिसरात आपली सेवा देण्याची तयारी दर्शविली व कामाला लागले. आता पावसाळा सुरू झाला असून एकदा दमदार पाऊस पडला की हाजरा फॉल धबधबा सुरू होईल आणि येथे पर्यटकांची एकच गर्दी राहील. अशात या परिसरात आपापली वेळ, वेगळी जबाबदारी सांभाळण्यासाठी येथील वन समितीचे युवक सज्ज झाले आहेत. ज्या युवकांना येथील जवाबदारी देण्यात आली त्यात समितीचे अध्यक्ष रामदीन उईके आणि सचिव सुरेश रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात चुन्नीलाल मरस्कोल्हे, रामसिंग मडावी, संतोष कोडवती, नरविंद मडावी, रेवल उईके, महेश वरकडे, रितेश वरकडे, देवेंद्र मरस्कोल्हे, राधेशाम मडावी, रमेश उईके, प्रदीप मडावी, दीपक चौधरी, नकेश चौधरी, भूवन उईके, विजेश मरकाम, रविंद्र मरस्कोल्हे, अरविंद कुमेटी, ज्योती उईके, ममता वरकडे, छाया वरकडे, अर्चना मडावी, रोशनी धुर्वे यांचा समावेश आहे.सदर युवकांना हाजरा फॉलच्या पर्यटनातून रोजगार उपलब्ध झालेला आहे. यासाठी उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी त्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा व प्रोत्साहन दिले. युवकांच्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.