पुण्यतिथी कार्यक्रम : समाजभवनासाठी १५ लाखांची घोषणाकुऱ्हाडी : असहकार आंदोलनात ६ आॅक्टोबर १९३० रोजी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जान्या-तिम्या यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील शहीद स्मारक येथे कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी खा. नाना पटोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून दामोदर नेवारे, सुरेंद्र बिसेन, उमा शहारे, जिल्हा परिषद सदस्य ललिता चौरागडे, जगदीश येळे उपस्थित होते. याप्रसंगी गावचे सरपंच संजय आमदे यांनी प्रास्तावीक मांडत शहीद स्मारक आहे त्या ठिकाणी सुसज्ज समाजभवन व्हावे अशी मागणी करीत खासदार पटोले यांना निवेदन दिले. तंटामुक्त समिती अध्यक्ष डी.एम.राऊत यांच्यासह अन्य पाहुण्यांनी शहीद जान्या-तिम्या यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी खासदार पटोले यांनी, समाजभवन बांधकामासाठी १५ लाख रूपये देण्याची घोषणा केली. तसेच क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान गावातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी शहीद जान्या-तिम्या यांना श्रद्धांजली अर्पित केली. संचालन पारधी यांनी केले. आभार पोलीस पालीट हेमराज सोनेवाने यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपसरपंच सुनील लांजेवार, देवराव कटरे, सुकलाल येरणे, हेमराज सोनेवाने, पोलीस पाटील अल्का पारधी, आनंद कटरे, ताराचंद शहारे, उखरे, टेकचंद कटरे, शंकर चौधरी, प्रभाकर ढोमणे, निरज धमगाये यांनी सहकार्य केले.
शहीद जान्या-तिम्यांची कुऱ्हाडीत केली आठवण
By admin | Published: October 09, 2015 2:12 AM