शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

रेल्वे प्रवाशांकडून ४० लाखांची वसुली

By admin | Published: June 19, 2015 1:20 AM

येथील रेल्वे स्थानकातून दरदिवशी नागपूर ते दुर्गदरम्यान विविध रेल्वे गाड्यांमध्ये जवळपास ७० तिकीट चेकर्स असतात.

विनातिकीट प्रवास : तीन महिन्यांत १७ हजार ४६८ फुकट्यांना पकडले गोंदिया : येथील रेल्वे स्थानकातून दरदिवशी नागपूर ते दुर्गदरम्यान विविध रेल्वे गाड्यांमध्ये जवळपास ७० तिकीट चेकर्स असतात. त्यांनी मागील तीन महिन्यांत १७ हजार ४६८ अशा प्रवाशांना पकडले जे चुकीच्या पद्धतीने प्रवास करीत होते. अशा प्रवाशांकडून मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत ३९ लाख ९९ हजार १४८ रूपयांची वसुली करण्यात आली. कुणाकडे तिकीट नव्हते तर कुणाकडे तिकीट असूनही ते दुसऱ्याच ठिकाणचा प्रवास करीत होते. असा चुकीचा प्रवास करणाऱ्या केवळ ५ टक्के प्रवाशांनाच पकडण्यात आले. तर उर्वरित ९५ टक्के प्रवाशी रेल्वे अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ घालून प्रवास करतात. अधिकाऱ्यांना लाच देवून प्रवास केला जातो. तर प्रसंगी पकडण्यात आल्यावर लाच देवूनच वाचणाऱ्यांची संख्यासुद्धा अधिक आहे.देशातील सर्वात मोठे जाळे म्हणून रेल्वेची ख्याती आहे. आपल्या गंतव्य स्थळी पोहोचण्यासाठी आतासुद्धा रेल्वेच्या प्रवासाला प्रथम पसंती व प्राधान्य दिले जाते. मात्र रेल्वेच्या संपत्तीला आतासुद्धा सामान्य नागरिक, प्रवाशी आपली संपत्ती समजत नाही. तसेच या संपत्तीला हानी पोहोचविण्याऱ्यांची संख्यासुद्धा कमी नाही. या प्रकारामुळे फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही प्रवाशी असेही आहेत की त्यांच्याकडे तिकीट तर असते, पण ही तिकीट दुसऱ्याच ठिकाणची असते. मात्र प्रवास तिसऱ्याच ठिकाणचा करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी नाही. नागपूर ते दुर्ग दरम्यान तीन महिन्यात असे चार हजार ८१६ प्रवाशांना पकडण्यात आले. मार्चमध्ये एक हजार १६९ प्रवाशांकडून रेल्वेने चार लाख ७३ हजार ६५५ रूपये, एप्रिलमध्ये एक हजार १८८ प्रवाशांकडून चार लाख ९३ हजार २१५ रूपये व मे महिन्यात दोन हजार ४५७ प्रवाशांकडून १० लाख ५५ हजार ३८६ रूपयांची वसूली करण्यात आली. तीन महिन्यात चार हजार ८१६ प्रवाशांकडून २० लाख २२ हजार २५६ रूपयांची वसूली करण्यात आली. यापेक्षा अर्ध्याधिक रक्कम केवळ एका मे महिन्यात मिळाली. विशेष म्हणजे मे महिन्यात लग्नसराईचे कार्यक्रम असतात. शक्यतो गर्दीची संधी साधून जवळील स्थानकाचे तिकीट काढून लांब अंतराचे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली व त्यामुळे पकडण्यात आलेल्यांच्या संख्येतही वाढ झाली. (प्रतिनिधी)विनातिकीट २ हजार २८९ प्रवाशीमागील तीन महिन्यांत गोंदिया ते नागपूर व गोंदिया ते दुर्ग दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोन हजार २८९ प्रवाशांना पकडण्यात आले. मार्च महिन्यात विनातिकीट ७१५ प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख १० हजार ७२१ रूपये वसूली करण्यात आले. एप्रिलमध्ये ८९८ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख ५५ हजार ९०७ रूपये वसूल करण्यात आले. तर मे महिन्यात ७२० प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख ८२ हजार ८१७ रूपयांची वसूली करण्यात आली.