दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे : विशेष तिकीट तपासणी अभियानलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग मार्गावर विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात १६ ते २२ मे २०१७ या केवळ सात दिवसात विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न करताच लगेज वाहून नेणाऱ्या प्रकरणांत रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहा लाख ७७ हजार ९५० रूपयांची वसुली केली. मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकारात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात १६ ते २२ मे २०१७ या कालावधीत नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग मार्गावरून धावणाऱ्या एकूण १०९ प्रवासी गाड्यांमध्ये व रेल्वे स्थानकांत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत विनातिकीट व अनियमित प्रवास तसेच माल बुक न करताच लगेजचे दोन हजार २८३ प्रकरणे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात सहा लाख ७७ हजार ९५० रूपये वसूल करण्यात आले. शिवाय केरकचरा पसरविणारे २६ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात दोन हजार ५५९ रूपयांची वसुली करण्यात आली.या विशेष तिकीट तपासणी अंतर्गत भंडारा रोड येथे किले बंदी तपासणी दरम्यान सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या नेतृत्वात २० मे २०१७ रोजी विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न केलेल्या लगेजचे ६२० प्रकरणे केवळ एका दिवसात नोंद करून त्यांच्याकडून एक लाख ८४ हजार १५० रूपयांची वसुली करण्यात आली.
सात दिवसांत ६.७७ लाखांची वसुली
By admin | Published: May 26, 2017 12:42 AM