गोपालदास अग्रवाल : शहर काँगे्रस कमिटीची विशेष सभा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार लोकहितांचे कार्य करण्याऐवजी फक्त जुन्या योजनांचे नवे नामकरण करण्यात लागली आहे. जीएसटीसारखे कायदे जे काँग्रेस सरकारच्या वेळेस १४ टक्के दराने लागू केले जाणार होते, त्याचा विरोध करून आज तेच कायदे भाजप सरकारने २८ टक्के दरावर देशात लागू केले. एवढेच नव्हे तर काँग्रेसशासित कर्नाटक राज्याच्या तुलनेत राज्यातील नागरिकांकडून सरकार पेट्रोलवर १० रूपये जास्त घेत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. येथील शहद भोला काँग्रेस भवनात शुक्रवारी (दि.१४) आयोजित शहर काँग्रेस कमिटीची विशेष सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष अशोक चौधरी होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, दर वर्षी २ कोटी नोकरी देण्याचे आश्वासन देणारी सरकार लघु उद्योगांना संपवून रोजगाराच्या संधी समाप्त करीत आहे. शेतकरी आपल्या दुविधा व त्रास सहन करीत जीवन जगत आहेत. मीडियाला आकड्यांची बाजिगरी दाखवून ‘अच्छे दिन’चा नकली माहोल तयार केला जात आहे. वास्तविक मात्र सर्व सामान्य माणूस अच्छे दिनपासून कोसो दूर आहे. अशात प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने सरकारच्या या अपयशाला सर्वांसमोर ठेवून त्यांच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी हटविण्याचे कार्य करायला हवे असे मत व्यक्त केले. सभेला नगरसेवक सुनील भालेराव, जिल्हा कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष पृथ्वीपालसिंह गुलाटी, जहीर अहमद, अजय गौर, नरेंद्र चांदवानी, योगेश अग्रवाल, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, निर्मला मिश्रा, पराग अग्रवाल, भागवत मेश्राम, देवा रूसे, व्यंकट पाथरू, मंटू पुरोहीत, मनोज पटनायक, चेतना पराते, कृष्णकुमार लिल्हारे, पुराण पाथोडे, अमर रंगारी, सुशील रहांगडाले, खलील पठाण, जग्गू वासनीक, कमल छपारीया, कचरूलाल अग्रवाल, राजू खंडेलवाल, लक्ष्मीकांत डहाटे, अरूण दुबे, राजू लिमये, महबूब अली, देवेंद्र अग्रवाल, कैलाश कापसे, नफीस सिद्धीकी यांच्यासह मोठ्या संख्येत कॉंग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.
पेट्रोलवर अतिरिक्त १० रूपयांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:28 AM