शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

लोकमतने ‘रक्ताचं नातं’अधिक खुलविलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 5:00 AM

लोकमत समूहाच्यावतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.२) स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णाच्या शासकीय रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, नगरसेविका भावना कदम, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते.

ठळक मुद्देराजेश खवले : लोकमत रक्ताचं नातं रक्तदान शिबिर : अनेक रक्तदात्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकमत समूहाने पुढाकार घेत रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. सर्व मानव जात ही एक आहे, हेच सांगणार नातं म्हणजे रक्ताचं नातं होय. हे नातं अधिक खुलविण्याचे कार्य लोकमत समूहाने केले आहे. लोकमत रक्ताचं नातं या महारक्तदान शिबिराचे आयोजन करून लोकमतने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. लोकमत समूहाच्यावतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.२) स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णाच्या शासकीय रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, नगरसेविका भावना कदम, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. जिल्हाधिकारी खवले म्हणाले, कोविडच्या संसर्गामुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्या आहेत. अनेक कुटुंबांचा आधारवड हिरावला आहे. अनेक मुलांवरील आई-वडिलांचे छत्र हिरावल्याने अनाथ होण्याची वेळ आली आहे. अशा संकटात असलेल्यांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना आधारवड मिळवून देण्याचे महान कार्य लोकमत समूह करीत आहे. खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे. रक्तदान शिबिरासाठी लोकमत समूहाने घेतलेला पुढाकार हा खरोखरच आदर्शवत असून आपणसुध्दा रक्तदान करून मोहिमेला अधिक बळ देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी खवले यांनी दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुध्दा लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन समाजसेविका डॉ. सविता बेदरकर यांनी केले तर आभार लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. शिबिरासाठी लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी वैभव शहाणे, सचिव कावळे, वर्षा भांडारकर, माधुरी परमार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात रक्त पेढी विभागाच्या डॅा. पल्लवी भजभुजे, अभिनय तराडे, अनिल गोंडाणे, अमित ठवरे, सुनील गोंडाणे, युवराज जांभुळकर, श्रृष्टी मुरकुटे, विनोद बन्सोड, प्रतिक बन्सोड, राकेश भेलावे, सुमीत जाधव, पल्लवी रामटेके यांनी सहकार्य केले. 

रक्तदानासाठी रक्तदाते आले पुढे लोकमत रक्ताचं नातं रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. तसेच लोकमतने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. रक्तदानापेक्षा कुठलेच दान मोठे नसून आपल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होत असल्याचा संदेश दिला. 

सडक अर्जुनी आणि सालेकसा येथे शिबिरलोकमत रक्ताचं नातं रक्तदान शिबिरांतर्गत ५ जुुलै रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे सकाळी ११ वाजता तर सालेकसा येथील एम. बी. पटेल महाविद्यालयात ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट