मुंडीकोटा : जवळ असलेल्या (घोगरा) पाटीलटोला या गावी शासनाने करोडो रुपये खर्च करुन प्रादेशिक नळयोजेना तयार केली. पण तरी योजना यावेळी कुचकामी ठरली आहे. या योजनेचे देखभालचे काम घोगरा येथील ग्रामपंचायतकडे सोपविण्यात आले आहे. पण येथील सरपंच व सचिव यांचे दुर्लक्ष झाले आहे. घोगरा गावात या नळयोजनेद्वारे पाणी पुरविण्यात येत असते. पण यावेळी उन्हाळा सुरू झाला असून या योजनेचे पाणी अर्ध्या गावाला मिळत असते. तर अर्धे गाव पाण्याने तहानलेले दिसत आहे. अर्ध्या गावाला पाणी मिळणे कठिण झाले आहे. या गावात घरोघरी नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. पण नळाला पाणीच येत नाही. यावेळी हे नळ कोरडे पडलेले दिसत आहेत. गावात बोअरवेल आहेत पण काही बोअरवेल बंद अवस्थेत पडून आहेत. गावात विहरी आहेत पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोरड्या होत आहेत. गावात एक विहिर आहे पण ती गावाबाहेर असून विहिर लांब अंतरावर आहे. त्यामुळे येथील महिलांना लांबदूर जातानी त्रास सहन करावा लागतो व पाणी घेवून घरी परत यावे लागते. या योजनेचे अनेक वॉल लिक असल्यामुळे पाणी बाहेर निघत असते. तसेच पाणी पाईपाची फिटिंग बरोबर नसल्यामुळे पाण्याच्या फोर्स पकडत नाही. अशी नेहमीच दिनचर्या या योजनेची झालेली निसत आहे. येथील सचिव मुख्यालयात न राहता बऱ्याच लांब अंतरावरुन येण्याजाण्यात वेळ घालवित असतात. त्यामुळे यांचे लक्ष गावाकडे नसून फक्त येण्याजाण्याकडे राहत असते. महिलांनी घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
प्रादेशिक नळयोजना ठरली कुचकामी
By admin | Published: April 09, 2015 1:01 AM