लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : खरीप हंगामातील धानपिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. यासाठी ओवारा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खराब झाले. काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा यातून भरुन निघणे कठीण आहे.परिणामी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतावित आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने रब्बीची पिकांची लागवड केली आहे.यासाठी ओवारा धरणाचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यास मदत होईल. अशी मागणी कारुटोलाचे उपसरपंच नंदकिशोर चुटे, प्रा. सागर काटेखाये,मनीराम शेंडे, देवेंद्र मुनेश्वर, कमलेश बोपचे, दुर्वेस दोनोडे, माजी सरपंच मिलींद गजभिये, उमेश दोनोडे, भिमा बोहरे, प्रकाश दोनोडे यांनी केली आहे. पाणी न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाला. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पाऊस चांगलाच बरसल्याने त्याचा फटका धान पिकांना बसला.शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमावावे लागले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमंतीने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. रब्बी पिकांना ओवारा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी मिळल्यास उत्पादन घेण्यास मदत होईल.आ.सहषराम कोरोटे यांनी याकडे लक्ष घालून ओवारा धरणाचे पाणी रब्बी पिकांसाठी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.दरवर्षी ओवारा धरणाचे पाणी रोटेशन पद्धतीप्रमाणे वाटप केल्या जाते. मागील दोन वर्षापासून सलंगटोला, हेटीटोला, कारुटोला, कवडी, वळद, साखरीटोला या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी धरणाचे पाणी मिळाले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागले होते. मात्र यंदा ओवारा धरणाचे पाणी न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.रबी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत वाढमागीलवर्षी रब्बी २७ हजार हेक्टवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. तर यंदा ३१ हजार ५०० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार हजार हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे.ज्वारी आणि जवसाची लागवडजिल्ह्यातील पीक पध्दतीत बदल करण्यासाठी आणि पांरपारिक पीक पध्दतीत बदल करण्यासाठी कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांना रब्बीत ज्वारी आणि जवसाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.यासाठी शेतकऱ्यांना जवस आणि ज्वारीचे बियाणे मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. जवळपास १३०० हेक्टरवर ज्वारी आणि ६०० हेक्टरवर जवसाची लागवड करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
रबी लागवडीसाठी धरणांचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:00 AM
खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खराब झाले. काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा यातून भरुन निघणे कठीण आहे.परिणामी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतावित आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने रब्बीची पिकांची लागवड केली आहे.यासाठी ओवारा धरणाचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यास मदत होईल.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : यंदा ३१ हजार ५०० हेक्टरवर लागवड