लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ झाली आहे. यानंतरही प्राधिकरणाने निळोणा प्रकल्पातून पाणी सोडले नाही. यामुळे काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ११ वाजताच्या सुमारास जीवन प्राधिकरणावर धडक दिली. यावेळी कार्यालयात कोणीच हजर नव्हते. अभियंत्यांच्या कक्षाबाहेर निळोणा जलाशयात पाणी नाही, असे फलकही लावलेले होते. पावसाळ्यात जलसाठा वाढला आहे. यानंतरही प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी हे फलक काढले नाही. यावर संताप नोंदविण्यात आला.बेंबळाचे पाणी कधी येणार, याची सध्यातरी शाश्वती नाही. याच सुमारास निळोणा जलशायात साठा वाढला असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी प्राधिकरणाने नळाद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.यावेळी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, उषा दिवटे, पल्लवी रामटेके, सुमती चंदनखेडे, सुरेखा श्रीवास, सिकंदर शहा, शब्बीर भाई, अजय किन्हीकर आदी उपस्थित होते.
निळोणाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 9:59 PM
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ झाली आहे. यानंतरही प्राधिकरणाने निळोणा प्रकल्पातून पाणी सोडले नाही. यामुळे काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ठळक मुद्देसाठ्यात वाढ झाल्याचा दावा : प्राधिकरणावर काँग्रेस कार्यकर्त्यांची धडक