नागरिकांना मिळणार मदत : पोलीस दलाचा उपक्रम, महिला होणार सुरक्षितदेवरी : आधुनिक काळात कॉम्प्युटर, मोबाईल व इंटरनेट सेवेचा लाभ विविध सोयीसुविधेकरिता केला जात आहे. या सेवेत आता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस दलातर्फे पोलीस महासंचालकांनी ‘प्रतिसाद’ ही सेवा अॅन्ड्राईड मोबाईलवर सुरू केली आहे. या अॅपचा वापर सर्व नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनलोड करून करावा, असे आवाहन देवरीचे ठाणेदार राजेंद्रकुमार तिवारी यांनी केले आहे. आधुनिक काळात मोबाईल सेवा ही लोकांचा अविभाज्य घटक बनलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस दलातर्फे पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ‘प्रतिसाद’ ही अॅप्स सेवा सुरू केली आहे. अगोदर १०० नंबरची टेलिफोन नंबर डायल सेवा सुरू करून लोकांची मदत करीत होते. आता याच धर्तीवर एन्ड्राईड मोबाईलवर ‘प्रतिसाद’ अॅप्स सेवा सुरू करून नागरिकांचे मदत करणार आहेत. ही सेवा महाराष्ट्रात कुठेही काम करणार आहे. अशा प्रकारची सेवा एन्ड्राईड मोबाईलवर महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केला आहे. यात विशेष म्हणजे ही सेवा आॅनलाईन व आॅफलाईन सुरू राहील. विशेषत: महिलांनी या अॅप्सची सेवा आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावी आणि आपल्या सुरक्षिततेकरिता या अॅप्स सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन देवरीचे ठाणेदार राजेंद्रकुमार तिवारी यांनी केले आहे. समाजात वाढणारे असुरक्षित वातावरण पाहता हे अॅप फायद्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
महिलांना ‘प्रतिसाद’चा दिलासा
By admin | Published: May 24, 2016 1:56 AM