शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याने शालेय विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:26 AM

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २५ एप्रिल रोजी घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा शासनाने पुढे ...

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २५ एप्रिल रोजी घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा शासनाने पुढे ढकलली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतल्याने यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेता आले नव्हते. अनेक शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेतले होते. त्यातच या परीक्षा पुढे ढकलल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे पालक वर्गातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र,ही मुदत आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याने अनेकांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहेत.

......

असा करावा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी https :// www. mscepuppss. in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, असे परीक्षा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले. तसेच या वेबसाइटवर वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज अशी परीक्षेची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.

.......

-दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण विभागाकडून घेतल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. आधी फेब्रुवारी ऐवजी २५ एप्रिल आणि आता २३ मे रोजी परीक्षेचा मुहूर्त ठरला आहे.

- २५ एप्रिल रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाची माहिती आहे.

- २३ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा ही परीक्षा लांबणीवर तर जाणार नाही अशी शंका मुख्याध्यापक व पालकांकडून उपस्थित केली जात आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अधिक सराव करण्याची संधी मिळत आहे.

..........

शिष्यवृत्ती परीक्षेव्दारे विद्यार्थ्यांना भविष्यात शासनाकडून शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यामुळे शाळेतून अधिकाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले पाहिजेत व तयारी झाली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना देखील शाळेतर्फे मार्गदर्शन केले जात आहे.

- एल.यू. खोब्रागडे, मुख्याध्यापक, जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा कारंजा.

.......

शिष्यवृत्ती परीक्षेचा विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होतो. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेस इतर सर्वच परीक्षांसाठी आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मार्गदर्शन करीत आहोत. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी चाचणी सुध्दा ऑनलाईन स्वरुपात घेत आहोत.

रवींद्र अंबुले, सहायक शिक्षक न.प. शाळा गोंदिया.

..........

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा टप्पा महत्त्वपूर्ण असतो. भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा, एमटीएस व तसेच विविध लेख वाचनाच्या परीक्षांना विशेष महत्व आहे. यासाठी आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना सहकार्य आणि प्रोत्साहन देऊन परीक्षेची तयारी करुन घेतो.

- शरद उपलपवार, मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा पदमपूर.

.....