देवानंद शहारे ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत पिकांच्या लागवडीवर लावले निर्बंध हटविले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सततच्या दुष्काळामुळे जलस्रोतांमध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागाने उन्हाळी पिकांना पाणी देण्यास नकार दिला होता. शिवाय भूजल पातळी खालावल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईकडे पाहून उन्हाळी पीक न घेण्याचा आदेश काढण्यात आला होता. परंतु निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्या ३० जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये सदर पिकांची लागवड करण्यास लावले निर्बंध हटविण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.खरीप हंगामात शेतकरी रोज आभाळाकडे बघून पावसाची वाट पाहत होता. मात्र अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकºयांना हाती आलेले पिक गमवावे लागले. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणातही मोबदला मिळाला नाही. ज्यांनी पीक लावले होते त्या पिकांवरही कीडरोगांनी आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभे पीक जाळले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड लागले. मागील चार दशकात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली होती.आता रबी व उन्हाळी धानपीक घेवून परिस्थिती सावरू असा विचार असतानाच १७ नोव्हेंबर २०१७ रोजी रबी/उन्हाळी पिके लावण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश काढण्यात आले होते.अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंध हटविण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. खासदार प्रफुल्ल पटेल यांनीे ७ जानेवारी २०१८ चे पत्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे १७ नोव्हेंबर २०१७ च्या कार्यालयीन पत्रानुसार ते आदेश रद्द करण्यात आले आहे.जिल्ह्यात धान पिकांच्या रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र पावसाने वेळोवेळी दगा दिल्याने हजारो हेक्टर क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले. तसेच कीडरोगांमुळे हाती आलेले उत्पन्नही गेले. त्यानंतर आता उन्हाळी धानपिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार हेक्टर असताना शासनाने लागवड न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता उन्हाळी धानपीक लावण्याचे आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.रब्बी पिकांची लागवड २४ हजार हेक्टरमध्येजिल्ह्यात लाखोळी, हरभरा, उळीद आदी कमी पाणी लागणाऱ्या रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८०० हेक्टर आहे. यापैकी २४ हजार हेक्टरवर रबी पिके लावण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात कडधान्य, तृणधान्य व गळीताची धान्य लावली जातात. सात हजार हेक्टरमध्ये लाखोळी, नऊ हजार ८०० हेक्टरमध्ये हरभरा व उर्वरित काही क्षेत्रात इतर कमी पाणी लागणाºया पिकांची लागवड करण्यात आली आहे.
उन्हाळी पिक लागवडीवरील निर्बंध हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:48 PM
मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश