नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना रूग्णांचे प्राण वाचिवण्यासाठी शासनाने आरोग्य विभागाकडे रेमडेसिव्हर इंजेक्शनची उपलब्ध करून दिले आहेत. असून सर्वच कोविड रूग्णालयांना जिल्हा रूग्णालयातूनच लसीचा पुरवठा करण्यात येते. विशेष म्हणजे अटींच्या आधारावर सर्वमान्यांनाही मेडिकलमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन २३६३ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.असे असले तरी खुल्या बाजारात फक्त एकाच मेडिकल दुकानातून या लसीची विक्री करण्याची परवानगी आहे. त्यातही एकच कोविड रूग्णालयातून प्रिस्क्रीपशने या दुकानामार्फत रूग्णाला लसीची मागणी केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने लसीची विक्री होत असली तरी याआधी एक लसची किंमत खुल्या बाजारातच अव्वाच्या सव्वा होती. यावर आखडपाखड झाल्यानंतर खुल्या बाजारात लस विक्रीवर बंद केली. परंतू अंतर्गत सेटींगचा मामला आजही कायम असल्याचे समजते.सवलतीत इंजेक्शन मिळण्यासाठी नियमप्रिस्कीप्शनवर ही लस शासनाने अधिकृत केलेल्या मेडिकल दुकानातून मिळत आहे. सर्वसामान्य रूग्णांना कोवीड उपचारासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनवरच ते विकता येणार आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शन निर्मिती करणारी कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुकानदारास हे इंजेक्शन २८०० रूपयात मिळणार असून त्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे हे इंजेक्शन विक्री करताना केवळ ५ टक्के कमिशनवर विकावे लागणार आहे. कोरोना रूग्णांना आता पाच हजार ८०० रूपयांऐवजी २ हजार ३६० रूपयाला हे इंजेक्शन नेमून दिलेल्या दुकानातून मिळत आहे.
रेमडेसिव्हर इंजेक्शन केवळ २३६० रुपयांत सर्वसामान्यांसाठी एकाच मेडिकलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 5:00 AM
प्रिस्कीप्शनवर ही लस शासनाने अधिकृत केलेल्या मेडिकल दुकानातून मिळत आहे. सर्वसामान्य रूग्णांना कोवीड उपचारासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनवरच ते विकता येणार आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शन निर्मिती करणारी कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुकानदारास हे इंजेक्शन २८०० रूपयात मिळणार असून त्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.
ठळक मुद्देशासकीय रूग्णालयात मोफत : लसीचा काळाबाजार होणार नाही याकडे लक्ष