लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : वैद्यकीय क्षेत्रात ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.ओबीसी समाजाला वैद्यकीय क्षेत्रात २७ टक्के आरक्षण असताना केवळ १.७६ टक्के आरक्षण देण्यात आले. त्या अंतर्गत केवळ ६९ ओबीसी विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. जेव्हाकी २७ टक्के आरक्षणानुसार १०५८ ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे आवश्यक होते. हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. तसेच महाराष्ट्रात ० टक्के ओबीसींना मिळाले आहे.हा अन्याय दूर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी व माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तिरथ येटरे, जि.प. सदस्य जियालाल पंधरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रफुल ठाकरे, पं.स. सदस्य हर्षिला मडावी, अजय बिसेन, कविता रहांगडाले, संतोष श्रीखंडे, जयश्री पुंडकर, प्रशांत गायधने, आनंद शर्मा, शुभम डोये, तुलेंद कटरे, रमन डेकाटे, दिनदयाल चौरागडे, धनलाल मेंढे व अन्य उपस्थित होते.
ओबीसी विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:31 AM
वैद्यकीय क्षेत्रात ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन : २७ टक्के आरक्षणाचा लाभ द्या