लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण-२०१९ ही मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्वाचा असून स्वच्छ सर्व्हेक्षणात अभिप्राय नोंदवा असे जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांनी कळविले आहे.केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण-२०१९ चा शुभारंभ केला आहे. संपूर्ण देशात स्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यांचा गुणानुक्र म ठरविणे हा सर्व्हेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या सर्व्हेक्षणातून गावांतील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराच्या ठिकाणांतील थेट निरीक्षण, स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामस्थांचा अभिप्राय तथा केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरील जिल्ह्याच्या माहितीवरून जिल्ह्याची क्र मवारी निश्चित करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना सर्व्हेक्षणात सहभागी करून घेण्याचे सुद्धा शासनाचे धोरण आहे.यातंर्गत जिल्ह्यातील १३ लाख लोकसंख्येपैकी साधारणत: २ लाख अभिप्राय नोंदविण्याचे गोंदिया जिल्ह्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी गावकरी, बचत गटांच्या महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, युवक व गावकऱ्यांनी स्वच्छ सर्व्हेक्षणातून अभिप्राय नोंदवून इतरांना सुद्धा अभिप्राय नोंदविण्यास सांगावे, देशपातळीवर आपले मत विचारात घेतले जात आहेत.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकांचा सहभाग गरजेचा असून नागरिकांनी स्वच्छ सर्व्हेक्षण अॅपवर अभिप्राय नोंदवून जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा असे जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी कळविले आहे.जिल्ह्यासाठी केवळ पाच मिनिटेप्ले-स्टोर मध्ये टाईप करु न अॅप इंस्टॉल करावयाचा आहे. त्यानंतर राज्य महाराष्ट्र, जिल्हा गोंदिया व भाषा मराठी निवडल्यास पुढे आपणास स्वच्छतेच्या बाबतीत चार प्रश्न विचारले जातील. त्याचे योग्य उत्तर देवून अभिप्राय नोंदविता येतो. याशिवाय १८००५७२०११२ या टोल फ्री क्र मांकावर सुद्धा अभिप्राय नोंदविता येईल. या सर्व प्रक्रि येला केवळ पाच मिनिटांचा वेळ लागतो.
स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:13 AM
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण-२०१९ ही मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या ...
ठळक मुद्देसंडे अँकर । स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण-२०१९ चा शुभारंभ