आॅनलाईन लोकमतगोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या बदली हवी चमूने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन बदलीचे आदेश त्वरित देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या नावाने दिले आहे.२७ फेबु्रवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये बदली प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यात बदली हवी असणाऱ्या चमूने शिक्षकांच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. विधवा, कुमारिका, परितक्ता यांना न्याय मिळवून द्यावा, शिक्षक संवर्ग भाग दोन मधील ३० किमी पेक्षा जास्त अंतरावर कार्य करणाऱ्य पती-पत्नी एकत्रिकरणाचे आदेश द्यावे, दºयाखोºयात, डोंगराळ भागात दुर्गम ठिकाणी कार्य करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा, संवर्ग ४ मधील बदली पात्र असणारा टप्पा क्रमांक ५ मध्ये जे शिक्षक गैरसोयी ठिकाणी आहेत त्यांना बदली हवी आहे. अशा शिक्षकांना २७ फेबु्रवारीच्या शासन निर्णयाप्रमाणे सोईच्या ठिकाणी आणता येणार आहे. बदली व्हावी यासाठी शिक्षक आतूररतेने वाट पाहत आहेत. बदलीचा आदेश न काढल्यास बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात खळबंदा येथील सहाय्यक शिक्षक कृष्णा कापसे, उत्तम टेंभरे, हुमेंद्र चांदेवार, बी.बी. ठाकरे, संदीप खेडीकर, रमेश उके, एम.सी. येडे, प्रभाकर मेश्राम, गायत्री कापसे, चंदा बैस, वैशाली मडकाम, मेश्राम, एल.डी. काळबांधे, सी.टी. कटरे, वर्षा राऊत, ए.एस. ब्राम्हणकर, आय.एस. बारेवार, डी.एस. कोहळे, एच.सी. पारधी, डी.के. चव्हाण, अनिल अंबुले, लांडेकर, रसीका वेरूळकर, डब्ल्यू.आय. उमाटे, डी.एम. मते, विश्वकर्मा व गिरीपुंजे यांचा समावेश होता.
बदलीसाठी ग्रामविकास मंत्र्यांच्या नावे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 9:51 PM
गोंदिया जिल्ह्याच्या बदली हवी चमूने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन बदलीचे आदेश त्वरित देण्याची मागणी केली आहे.
ठळक मुद्देजीआरची अमंलबजावणी करा : ३० किमीच्या अंतरातील दाम्पत्यांना एकत्र आणा