अर्जुनी-मोरगाव : जनगणना २०११ मध्ये प्रगणक म्हणून कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनगणना कार्य केल्याचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका अर्जुनी-मोरगावच्या वतीने नायब तहसीलदार ए.एस. पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी प्रमाणपत्र देण्यात येतील, असे आश्वासन नायब तहसीलदार पाटील यांनी दिले.शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष विनोद बडोले व मार्गदर्शक रमेश गहाणे यांच्या नेतृत्वात तालुका पदाधिकारी प्रगणक यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार यांच्या दालनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. चर्चेदरम्यान जनगणना २०११ च्या ४५ दिवसांच्या जनगणना बदलीरजा सेवापुस्तिकेत जमा-नोंद करण्यासाठी तहसील कार्यालयातून जनगणना प्रगणक नेमणूक यादी आदेश जनगणना केल्याचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रगणक या बदली रजा लाभापासून वंचित राहिले, ही बाब निदर्शनास आणूण देण्यात आली. तात्काळ प्रगणक नेमणूक यादी आदेश/प्रमाणपत्र प्रगणकांना देण्यात यावे, अशी मागणी करून निवेदन देण्यात आले. या वेळी पाटील यांनी संबंधित विभागातील कर्मचारी राकेश डोंगरे यांना सूचित करून आठ दिवसांत प्रगणकांना नेमणूक यादी आदेश प्रमाणपत्र देण्यास सांगितले.शिष्टमंडळात विनोद बडोले, रमेश गहाणे, सिद्धार्थ खोब्रागडे, कैलाश हाडगे, श्रीकृष्ण कहालकर, दिलीप लोधी, विठोबा रोकडे, संजय कोरे, राजेश् मरघडे, एच. बहेकार, शरद लंजे, रविंद्र वालोदे, दूधराम बारापात्रे, श्रीकृष्ण कोरे, गुणवंत मेश्राम, देव झलके, सेलोकर, किशोर लंजे, सुनील बडोले, विजय शहारे, नेवारे, नरेश लंजे, गोपाल जनबंधू, गायकवाड, मेश्राम, आर.एस. जांभूळकर, मदने, मोरे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
शिक्षक समितीचे तहसीलदारांना निवेदन
By admin | Published: October 05, 2016 1:14 AM