शहरं
Join us  
Trending Stories
1
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
2
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
3
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
4
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
5
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
6
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
7
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
8
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
9
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
10
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
12
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
13
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
14
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
15
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
16
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
17
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
18
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
19
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
20
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण झाले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:15 IST

२७४ पदे महिलांसाठी राखीव : याच आरक्षणानुसार होणार पुढील पाच वर्षात निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येणाऱ्या पाच वर्षातील जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले झाले आहे. ५४५ पैकी २७२ पदे आरक्षित असणार आहेत, तर २७३ सरपंचपदे ही खुली राहणार आहेत. महिलांसाठी तब्बल २७४ पदे आरक्षित असणार असून, यातील १३७पदे ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राहणार आहेत.

सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हे सरपंचपद आरक्षण निश्चित झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले. शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी मंगळवारी (दि.१५) जाहीर केली. याच आरक्षण सोडतीनुसार आता पुढील पाच वर्षातील म्हणजे २०२५ ते २०३० या कालावधीत येथील सरपंचपदाच्या निवडणुका होणार आहे. सरपंच पदाची ही आरक्षण सोडत ही त्या त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीनंतर आता इच्छुकांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरु करणार आहेत.

२४ एप्रिल रोजी तालुकास्तरावर सोडत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायत सरपंचाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यानंतर आता कोणत्या ग्रामपंचायतचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार याची आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे

३३९ सदस्य व ६ सरपंचपदासाठी होणार पोटनिवडणूकजात वैधता प्रमाणपत्र, निधन आणि इतर कारणामुळे जिल्ह्यातील ३३९ ग्रामपंचायत सदस्य व ६ सरपंचाची पदे रिक्त आहे. या रिक्तपदांसाठी जिल्ह्यात लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती आहे.

असे असणार प्रवर्गानुसार सरपंचपदाचे आरक्षणजिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी अनुसूचित जातीसाठी ६७ सरपंचपदे आरक्षित राहणार आहेत. यापैकी ३४ महिलांकरिता, अनुसूचित जमाती १०० पदांपैकी ५० महिलांकरिता राखीव, ओबीसी प्रवर्गासाठी १०५ पदांपैकी ५३ महिलांसाठी राखीव, तर खुला प्रवर्ग २७३ सरपंचपदांपैकी १३७पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत, तर एकूण ५४५ सरपंचपदांपैकी २७४ पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत. आता कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे हे २४ एप्रिलच्या सोडतीनंतर स्पष्ट होईल.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचाची संख्यातालुका                    सरपंच संख्यागोंदिया                          ११०तिरोडा                           ९३गोरेगाव                          ५६देवरी                             ५५आमगाव                         ५७सालेकसा                        ४०अर्जुनी मोरगाव                ७१सडक अर्जुनी                  ६३एकूण                           ५४५

अनेक इच्छुकांच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या नजरा५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण काय निघते, याकडे गावागावातील इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी बुधवारी जिल्ह्यातील एकूण ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे आता इच्छुकांनी आतापासून त्यासाठी मोर्चेबांधणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgondiya-acगोंदिया