लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यासाठी सर्कल निहाय आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. या आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते गंगाधर परशुरामकर आणि जि.प.सदस्य कुंदन कटारे यांच्यासह दिग्गज सदस्यांना बसला. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने जि.प.मध्ये महिलाराज पाहायला मिळणार आहे.जिल्हा परिषदेच्या ५३ गटासाठी झालेल्या आरक्षण सोडतीत ३० जागा आरक्षित करण्यात आल्या.त्यामध्ये अनुसूचित जातीकरिता सहा जागांपैकी तीन जागा महिलांकरीता, अनुसूचित जमातीच्या १०जागांपैकी पाच जागा महिलांसाठी, नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी) च्या १४ जागांपैकी सात जागा महिलांकरीता तर खुल्या गटातील २३ जागांपैकी १२ जागा महिलांकरीता आरक्षित करुन सोडतीद्वारे काढण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी बेलपात्रे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आरक्षण सोडतीत गोंदिया तालु्क्यात सर्वाधिक अनु.जमाती व जातीचे आरक्षण आले. तसेच महिलांचे आरक्षण आल्याने राजकिय धुरंधरांचे स्वप्न धुळीस मिळाले. तर राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर, कुंदन कटारे यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली.पी.जी.कटरे, राजलक्ष्मी तुरकर व हामीद अल्ताफ यांना मात्र परत संधी मिळाली आहे.अनु.जाती (६ गट ३ महिला राखीव)५ - पांढराबोडी (महिला)१०- पिंडकेपार (महिला)४३- गोटाबोडी (महिला)२७- कुºहाडी४५- ककोडी४७- गोठणगावअनु.जमाती (१० पैकी ५ महिला राखीव)२- पांजरा (महिला)३- काटी४- धापेवाडा६- कामठा११- कुडवा१३- खमारी (महिला)१८- ठाणा२६- घोटी (महिला)३५- सरांडी (महिला)३९- सौंदड (महिला)नामाप्र (ओबीसी) (१४ पैकी ७ महिला राखीव)७- नागरा१५- घाटटेमणी (महिला)१६- किकरीपार (महिला)१७- गोरठा (महिला)२२- तिरखेडी (महिला)३१- सेजगाव३३- ठाणेगाव (महिला)३४- कवलेवाडा३७- पांढरी४९- बोंडगांवदेवी (महिला)५०- माहूरकुडा५१- इटखेडा५२- महागांव (महिला)५३- केशोरीसर्वसाधारण (२३ पैकी १२ महिला राखीव)१- बिरसोला (महिला)८- रतनारा९- एकोडी (महिला)१२- आसोली१४- फुलचूर१९- अंजोरा (महिला)२०- झालीया (महिला)२१- पिपरीया (महिला)२३- कारूटोला (महिला)२४- शहारवानी२५- सोनी२८- मुंडीपार (महिला)२९- निंबा३०- अर्जुनी३२- सुकडी (महिला)३६- वडेगाव (महिला)३८- डव्वा (महिला)४०- चिखली (महिला)४१- शेंडा४२- पुराडा४४- भर्रेगाव४६- चिचगड४८- नवेगावबांध (महिला)
आरक्षणाचा दिग्गज सदस्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 9:48 PM
आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते गंगाधर परशुरामकर आणि जि.प.सदस्य कुंदन कटारे यांच्यासह दिग्गज सदस्यांना बसला. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने जि.प.मध्ये महिलाराज पाहायला मिळणार आहे.
ठळक मुद्देमहिलांसाठी राखीव जागा वाढल्या : आरक्षण जाहीर, परशुरामकर व कटारे यांना शोधावा लागणार सुरक्षित मतदारसंघ