शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

जिल्हावासीयांना हुतात्म्यांचा विसर

By admin | Published: August 09, 2016 12:55 AM

इंग्रजी राजवटीतून देशाची मुक्तता करण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

स्मारकांची दुरवस्था : एका दिवसाच्या आठवणीपुरते उरले क्रांतीवीरांचे बलिदान नरेश रहिले/डी.आर.गिरीपुंजे ल्ल गोंदिया/तिरोडा इंग्रजी राजवटीतून देशाची मुक्तता करण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांनी कारावास भोगला. त्या स्वातंत्र्यविरांच्या स्मरणार्थ राज्यात ठिकठिकाणी शहीद स्मारके उभारल्या गेली. दरवर्षी ९ आॅगस्टला औपचारिकता म्हणून या स्मारकांवर येऊन ध्वजारोहणही केले जाते. पण या स्मारकांची होत असलेली दुरवस्था पाहिल्यानंतर ते नवीन पिढीला प्रेरणा देण्याऐवजी नवीन पिढीच्या विस्मृतीत जातात की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी अशा प्रकारचे हुतात्मा स्मारक आहेत. गोंदिया शहरातील सुभाष बगिच्यात सन १९८३ मध्ये हुतात्मा स्मारकाची स्थापना करण्यात आली. या स्मारकात विद्युत व्यवस्था आहे. पंखे लागले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. बागेत असल्यामुळे बगिच्यातील कर्मचारी कधीकधी साफसफाईही करतात. मात्र कोण होते हे हुतात्मे, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय, याबद्दल विचारले असता तरुण पिढीच काय, मध्यमवयीन नागरिकांकडूनही याचे उत्तर मिळत नाही. सुभाष बागेत असलेल्या या शहीद स्मारकाच्या सभागृहात ५० लोक बसू शकतात एवढी जागा आहे. दरवर्षी राष्ट्रीय सणांच्या काही दिवसांपूर्वी या स्मारकाची व सभागृहाची संपूर्ण स्वच्छता केली जाते. बागेतील कर्मचाऱ्यांची मागणी असल्यास सभागृहाची दुरूस्ती केली जाते. याशिवाय काही तुटफूट झाल्याची माहिती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाला दिल्यानंतर त्याची सुधारणा केली जाते. एरवी या स्मारकांबद्दल कोणालाही आस्था किंवा आदरभाव दिसून येत नाही. मागील अनेक वर्षापासून स्मारकाची दुरूस्ती झाली नसल्याने अनेक ठिकाणी स्मारक फुटले आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या परवानगीने छोटेखानी विविध कार्यक्रमांसाठी या स्मारकाचा छोटेखानी हॉल मोफत उपलब्ध करून दिला जातो. स्मारकाच्या देखभाल दुरूस्तीसाठी केवळ पाच ते दहा हजार रूपयांचा वार्षिक खर्च येत असला तरीही नगर परिषद त्याकडे दुर्लक्ष करते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देवून हौतात्म्य पत्करणारे भोला अनंतराम किराड यांच्या स्मृतीचे फलकही गोंदियातील स्मारकावर कोरलेले आहे. याशिवाय बाहेरील स्तंभाजवळील सिमेंटच्या दगडांवर जिल्ह्यातील ७० स्वातंत्र संग्राम सैनिक व शहिदांची नावे कोरलेली आहेत. स्मारकाच्या बाजूलाच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे शहीद चंद्रशेखर आझाद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. त्यालाही खालून भेगा पडत आहेत. येथे आल्यावर हृदय देशभक्तीने भरून, मन भारावून जात असल्याचे चित्र आजघडीला पहायला मिळाले नाही. कोणत्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना येथे आणून त्या स्मारकाचे महत्व सांगितले जात नाही. असेच चित्र पुढेही कायम राहिल्यास हे स्मारकच काय, हुत्मात्यांची नावेही विस्मृतित गेल्याशिवाय राहणार नाही. तिरोड्यातील स्मारकात घाणीचे साम्राज्य ४तिरोडा येथील शहीद मिश्रा यांच्या स्मृतित बनविलेल्या हुतात्मा स्मारकाची देखभाल करण्याकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. दर्शनी भाग पूर्णत: उखडलेला असून परिसरात कचरा व घाणीचे साम्राज्य आहे. या ठिकाणी भेट देऊन प्रेरणा घेण्यासाठी येणाऱ्यांऐवजी या परिसरात असामाजिक तत्वांचा वावर असतो. या परिसरातील जागेत काही वाहने पार्किंग केलेली असतात. वाहनांचे चालक त्या ठिकाणी बसून गप्पा मारतात. स्मारकाच्या सुरक्षिततेचे कोणतेही उपाय केलेले दिसत नाही. कुऱ्हाडीचे स्मारक नावाचेच ४गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे शहीद जान्या-तिम्या या बंधूंच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारलेले हुतात्मा स्मारक म्हणजे दुर्लक्षितपणाचा कळसच आहे. या स्मारकाची अवस्था इतकी वाईट आहे की प्रशासकीय यंत्रणेने कित्येक वर्षात त्या ठिकाणी ढुंकूनही पाहीले नसल्याचे लक्षात येते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे या स्मारकाची देखभाल दुरूस्ती आहे. मात्र या विभागाचे अधिकारी असो की जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, त्यांना या हुतात्म्यांच्या स्मृति जपण्याची आस्था दिसून येत नाही.