लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. निवेदन दिले होते. मात्र प्रशासन व शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. परिणामी श्रीरामनगर येथील व पूर्वाश्रमीच्या कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारपासून (दि.२५) गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील जंगलातच आंदोलन सुरू केले आहे. गुरूवारी (दि.२८) चौथ्या दिवशी जंगलातच मुक्काम ठोकून आंदोलन सुरू ठेवले. दरम्यान गुरूवारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंदोलकाच्या पाच प्रतिनिधीना मुंबई येथे बोलविण्यात आले.श्रीरामनगरवासीयांनी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन न देण्यात आल्याने आपल्या पूर्वीच्या कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावात जावून राहण्याचा इशारा देत सोमवारी (दि.२५) गावांच्या दिशेने कुच केली. मात्र वनविभागाने गावकऱ्यांचा संताप लक्षात घेत गावाकडे जाणाºया जंगलातील प्रवेशव्दारावर ताराचे कुंपन करुन गावकऱ्यांना रोखून धरले. त्यामुळे श्रीरामनगरवासीयांनी सुध्दा माघार न घेता जंगलातील या मार्गावरच आपला मुक्काम ठोकला. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच मागील चार तीन दिवसांपासून जंगलातच आपल्या मुलाबाळांसह मुक्काम ठोकला. जवळपास सहाशे गावकरी याच ठिकाणी स्वयंपाक तयार करीत असून याच ठिकाणी झोपत आहे. मात्र प्रशासनाने यावर अद्यापही तोडगा काढला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्याप्त आहे.दरम्यान गुरूवारी (दि.२८) आंदोलकाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बोलविण्यात आले होते. यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर शुक्रवारी (दि.१) चर्चा करण्यात येणार आहे. मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.आंदोलकांना स्वंयसेवी संस्थांची मदतमागील तीन दिवसांपासून श्रीरामनगरवासीय जंगलात आंदोलन करीत आहे. याच ठिकाणी ते स्वंयपाक करुन राहात आहे. या आंदोलकांना धान्य व इतर वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अनेक स्वंयसेवी संस्था पुढे येत आहे.वनविभागावरील ताण वाढलाश्रीरामनगरवासीयांनी अद्यापही आपले आंदोलन मागे घेतले नसून जंगलातच मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाºयांचा सुध्दा जंगलातच मुक्काम आहे. यामुळे मात्र वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांवरील ताण वाढला आहे.
श्रीरामनगरवासीयांच्या आंदोलनावर मुंबईत तोडगा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:40 PM
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.
ठळक मुद्देचौथ्या दिवशीही जंगलातच मुक्काम : गावकरी भूमिकेवर ठाम, बैठकीकडे सर्वांचे लक्ष