लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सुकळी खैरीच्या वतीने बोळदे येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम चार दिवस राबविण्यात आली.सरपंच लालसिंह चंदेल व ग्रामसेवक परमेश्वर नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा.पं.सदस्य धम्मदीप मेश्राम, ज्ञानू प्रधान व प्रमिला मेश्राम यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरिक व युवकांना सोबत घेऊन संपूर्ण गावात प्रत्येक घरी जावून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५२,५३ नुसार शासकीय जागेत असलेले व नालीवर असलेली लाकडे, कुंपन, रेती, विटा, गिट्टी, ट्रॅक्टर ट्रॉली,जनवारांचे गोठ्याचे बांधकाम करणे गुन्हा असल्याचे पटवून दिले. तसेच शासकीय जागेवरील अतिक्रम हटविण्याची विनंती केली. ग्रामपंचायतने काही अतिक्रमणधारकांना नोटीस सुध्दा दिली. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. यामुळे गाव अतिक्रमण मुक्त करण्यास मदत झाली.अतिक्रमण हटाव मोहीमेच्या यशस्वीतेसाठी शैलेश रामटेके,सहादेव चनाप, आबाजी किरसान, रामू साऊस्कार, दामोधर बागडे, वियाल चिमणकर, मंगलमूर्ती रामटेके, संतोष मेश्राम, दीपक प्रधान, डिलक्स सुखदेवे, शिवकुमार चनाप, विशाल मेश्राम, रमण रामटेके, प्रांजल चिमनकर, शुभम हुमणे, रंजीत जांगळे, दिलीप किरसान, संजय किरसान, चंद्रशेखर रामटेके, किशोर किरसान आदी यांनी सहकार्य केले.
अतिक्रमण हटाव अभियानाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 1:10 AM
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सुकळी खैरीच्या वतीने बोळदे येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम चार दिवस राबविण्यात आली.
ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : गाव झाले अतिक्रमणमुक्त