लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजात समाजात मानवता, मैत्री, अहिंसा व करूणा यासारख्या मानवीय मूल्यांची स्थापना करण्यासाठी तथागत बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. त्यानंतर सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्राचे अनुवत्तन करून धम्माच्या कार्याला गती दिली. आता धम्माचा रथ पुढे नेण्याची जबाबदारी बौद्ध अनुयायांची आहे. वर्तमानकाळात युवावर्ग हे कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतात, असे प्रतिपादन महानाग शाक्यमुनी विज्जासन संस्थेचे भदंत चंद्रकित्ती मंजुश्वर यांनी केले.सम्यक सम्बुद्ध बुद्धविहार गौतमनगर येथे जयभीम जनजागृती बौद्ध मंडळांतर्गत नव्याने स्थापित एसएसडी संस्कार केंद्रातर्फे चार दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवाची सांगता मंगळवारी ३१ आॅक्टोबरला झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने बुद्धिस्ट समाज संघाचे रोशन मडामे, डी.डी. मेश्राम, समता गणवीर, कल्पना शेंडे, महेंद्र कठाणे, राजू वंजारी, अनिल गोंडाणे उपस्थित होते.चार दिवसीय महोत्सवात बौद्धिक कार्यक्रमांतर्गत चित्रकला, रांगोळी, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सामाजिक विषयांवर नाटक, भीमबुद्ध गीतांवर नृत्य व गीतगायन कार्यक्रम सादर करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमांतर्गत भदंत चंद्रकित्ती यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. लहान मुलामुलींकरिता क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन व व्यवस्थापनाबद्दल अतुल सतदेवे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सहयोगिता व बक्षीस वितरणासाठी बुद्धिस्ट समाज संघ, क्रांती चौरे, राजू वंजारी, वामन गजभिये, सुरेश वासनिक, अशोक बडगे यांचे सहकार्य लाभले.संचालन मनिषा राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी जयभीय जनजागृती बौद्ध मंडळाचे बाबुराव जनबंधू, कार्तिक रामटेके, प्रेमलाल मेश्राम, हंसराज बन्सोड, वनमाला कोल्हाटकर, उर्मिला लांजेवार, अनिता गजभिये, कमलेश मेश्राम, कमल बन्सोड, विक्की बडगे, विदूर भावे आदींनी सहकार्य केले.सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रमकार्यक्रमात उत्कृष्ट प्रदर्शन व सहयोगाकरिता अनेकांना पुरस्कृत करण्यात आले. यात राहुल बघेल, ललीत, श्वेत व अनुश्री वैद्य यांना नृत्य, संगीत साखरे पोवाडा गृप, चेतना रामटेककर वक्तृत्व, नेहा कोल्हटकर व शिखा लांजेवार यांना व्यवस्थापनासाठी स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आले. तर स्पर्धेमध्ये सहभागी श्वेता लांजेवार, मिताली, प्रियंका लांजेवार, विनिता मेश्राम, पायल बन्सोड, आरोही शहारे, एकता मेश्राम, प्रणाली, दिव्या ठाकरे, अंकिता चव्हाण, प्रशांत नागभिरे, नितीन मेश्राम, गीता लाचरवार, प्राची वासनिक, शोभा श्रीरंगे, नाईस गजभिये, रिद्धी हुमणे, अंजली चौधरी, भावना गजभिये, आम्रपाली वासनिक, प्राची, रिया पाटील, ज्वाला गणवीर, सोनाली मेश्राम, एकता उके, शुभांगी उके, प्राची डोंगरे, स्रेहल, उन्नती, महक हुमने, अंशिका, श्वेता भावे, खुशी नागभिरे, किटू सावनकर, धनश्री वंजारी, निखिल, राज, साहील, प्रज्वल वरठे, माही चौरे, दामिनी गजभिये, आशीष श्रीरंगे, नैतीक, समिक्षा भोयर, रूनाल बडोले, रचना गजभिये, रजनी चौरे, श्वेता बडोले, प्रगती मेश्राम, तन्मया बोरकर, आम्रपाली जांभूळकर व नगर सेविका वर्षा खरोले यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.
धम्माचा रथ पुढे नेण्याची जबाबदारी युवा वर्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:01 AM
समाजात समाजात मानवता, मैत्री, अहिंसा व करूणा यासारख्या मानवीय मूल्यांची स्थापना करण्यासाठी तथागत बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केले.
ठळक मुद्देभदंत चंद्रकित्ती मंजुश्वर : चार दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवाची सांगता