शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

निलंबनाची कार्यवाही मागे घ्या

By admin | Published: July 09, 2017 12:21 AM

मग्रारोहयोच्या हजेरीपत्रकाचे दिरंगाईचे सबब पुढे करून तुमसर तालुक्यातील तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

ग्रामसेवक संघटनेची मागणी : पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : मग्रारोहयोच्या हजेरीपत्रकाचे दिरंगाईचे सबब पुढे करून तुमसर तालुक्यातील तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. ती मागे घ्यावी यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक संघटना एकवटली व निर्णय मागे घेण्याकरिता आज ७ जुलैला पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. राकेश वैद्य, डी.बी. गायधने, एल.एस. घाटोळकर असे निलंबित केलेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत निलंबनाने अदा करण्यात येणाऱ्या मजुरीवर नुकसान भरपाई देण्याबाबतचे शासन निर्णय आहे. त्या निर्णयात मग्रारोहयोच्या संपूर्ण कामाची जबाबदार अधिकारी कर्मचारी व यंत्रणेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. यात कुठेही ग्रामसेवकाला जवाबदार ठरविण्यात आले नसताना हजेरीपत्रकाच्या दिरंगाईचे ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णयाला बगल देत अन्यायकारक निलंबनाची कार्यवाही तीन ग्रामसेवकांवर करण्यात आली. सदर कार्यवाही तात्काळ मागे घेवून ग्रामसेवकांवर झालेल्या अन्याय दुर करावा या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा तुमसरच्या वतीने पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन पुकारून कार्यवाहीचा ग्रामसेवकांनी निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल धमगाये, सचिन नरेंद्र सौदागर, दिनेश सिंदराम, शैलेश शेंडे, विद्या गजभिये, अश्विन डोहळे, राहुल कारेमोरे, पी.एच. येल्ले, एच.एम. पडोळे, डी.बी. गायधने, भांडारकर, डी.डी. सार्वे, राकेश वैद्य, निलेश गावनेर, एच.बी. कावळे, दुर्गा शेंडे, मुक्ता शेंडेसह तालुक्यातील असंख्य ग्रामसेवक उपस्थित होते.