लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येथील सांझा ९ अंतर्गत येणारे सर्वे क्र मांक २८८, गणेशनगर परिसरात वडसा कोहमारा रोडच्या कडेला राईसमिलमधून निघणारी विषारी राख रस्त्याच्या कडेला फेकली जात आहे. ही राख हवेसह रस्त्याच्या दिशेने वाहत असते. लगतच लोकवस्ती आहे.या राखेत विषारी घटक असतात,यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.राखेमुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे डोळे सुध्दा निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या कडक उन्हाळा सुरू असून जोराचे वादळ येत परिणामी येथील राख आणि बारीक धूर,मातीचे शहरात पसरात. यामुळे मागील आठवडाभरापासून अर्जुनी मोरगाव शहरात धुळीचे वातावरण आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. येथील नागरिक या जीवघेण्या प्रकारामुळे त्रस्त आहेत.कित्येकांच्या डोळ्यात ही राख गेल्याने अंधत्व येण्याची वेळ येऊ शकते. या राखेत विष्यारी घटक असतात त्याने त्वचेचे रोग होतात.यापूर्वी सुध्दा तावसी टोली परिसरात असाच प्रकार घडला होता. तेव्हा इटखेडा येथील अनेक नागरिकांना डोळ्याचा आजार झाला होता.राईसमिलची घाण व राख लोकवस्ती जवळ टाकता येत नाही. या घाणीची विल्हेवाट स्वत: राईस मिल मालकाने करायची असते, मात्र पैसे वाचिवण्यासाठी केलेला हा प्रकार निंदनीय आहे. राख टाकण्यात आलेली जागा ही समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी प्रस्तावित आहे. बाजूला लागूनच हनुमान मंदिर व बुद्ध विहार आहे.या दोन्ही ठिकाणी हिंदू व बौद्ध समाजबांधव सकाळी व सायंकाळी पूजाअर्चना करतात.हाकेच्या अंतरावर रेल्वे लाईन गेली आहे. ही राख या सर्वांना प्रभावित करीत असल्याची तक्र ार आहे. सदर दूषित राख त्या ठिकाणाहून हलविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. एकीकडे शासन पर्यावरण संरक्षण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो.विविध उपाय योजना करून जनजागृती केली जाते यानंतर असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पर्यावरणाचा ºहास करणाºया राईस मिल चालकावर नगरपंचायत, पर्यावरण विभाग काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राईस मिलची राख रस्त्याच्या कडेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 9:27 PM
येथील सांझा ९ अंतर्गत येणारे सर्वे क्र मांक २८८, गणेशनगर परिसरात वडसा कोहमारा रोडच्या कडेला राईसमिलमधून निघणारी विषारी राख रस्त्याच्या कडेला फेकली जात आहे. ही राख हवेसह रस्त्याच्या दिशेने वाहत असते. लगतच लोकवस्ती आहे.या राखेत विषारी घटक असतात,यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : संबंधित विभागाचे दुर्लक्ष