शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

तालुक्यात ४८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:06 PM

तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या ३२ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४८ हजार ८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठळक मुद्देप्रशासन सज्ज : सरपंचपदाचे १०३ तर सदस्यांसाठी ५१२ उमेदवार

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या ३२ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४८ हजार ८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सोमवार (दि.१६) आॅक्टोबरला सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार असून ३१ ग्रामपंचायतीत एकूण ९७ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. ज्या ३१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यात लोहारा, कोसमतर्रा, बिजेपार, पांढरवाणी, बोदलबोडी, भजेपार, मक्काटोला, गांधीटोला, कडोतीटोला, पिपरीया, दरेकसा, टोयागोंदी, जमाकुडो, निंबा, तिरखेडी, खोलगड, गिरोला, नानव्हा, रोंढा, गोर्रे, झालीया, धानोली, दरबडा, बिंझली, कहाली, लटोरी, नवेगाव, पाथरी, बाम्हणी, खेडेपार आणि सोनपुरी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.तालुक्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रत्यक्ष देखरेखीत संपूर्ण निवडणूक यंत्रणा कामाला लागली असून शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. यासाठी ९७ मतदान केंद्रावर एकूण ४२८ कर्मचारी कामावर लावण्यात आले आहे. यात ९७ केंद्राध्यक्ष आणि २९१ मतदान अधिकारी असून काही कर्मचाºयांची राखीव नियुक्ती करण्यात आली आहे.या व्यतिरिक्त तालुका प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग देत आहेत. यात बीडीओ अशोक खाडे, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, वाय.सी. भोयर, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांच्यासह सर्व कार्यालयातील अधिकाºयांचा समावेश आहे.३० सरपंच पदासाठी १०३ उमेदवार३२ ग्रामपंचायतींपैकी १७ ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव असून यात आमगाव खुर्दमध्येही महिला राखीव होती. परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच खेडेपार ग्रामपंचायतीवर महिला सरपंच बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता ३० सरपंच पदासाठी १५ महिला आणि १५ पुरुष सरपंच बनण्यासाठी एकूण १०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी २४ हजार २४५ पुरुष आणि २३ हजार ८४४ महिला, असे एकूण ४८ हजार ८९ मतदार मतदान करतील.अनेक दिग्गज उतरले मैदानाततालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदपासून आमदार, खासदारसुद्धा आरक्षित पदे असल्याने आता तालुक्यातील दिग्गज नेत्यांचे सरपंच निवडणुकीकडे लक्ष आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीत खुल्या प्रवर्गाचे सरपंच पद अनारक्षित आहे त्या ठिकाणी तालुका ते जिल्हा पातळीवरील पक्ष पदाधिकारी आपले नसीब आजमावत आहेत. यात कोणी सरपंच तर कोणी सदस्य म्हणून उमेदवार आहेत. यात भाजपचे तालुकाध्यक्ष परसराम फुंडे गिरोला येथे, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण नागपुरे बाम्हणी येथे, भाजपचे जिल्हा सचिव संजू कटरे तिरखेडीतून, काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष देवचंद ढेकवार बिंझली येथे सरपंच बनण्यासाठी थेट मैदानात उतरले आहेत. त्याच बरोबर अनेक दिग्गजांनी आपल्या पत्नी मैदानात उतरवून निवडणुकीची धुरा सांभाळी आहे.नक्षलग्रस्त भागात कडेकोट बंदोबस्ततालुक्यातील दरेकसा, पिपरीया आणि बिजेपार परिसर नक्षल प्रभावित भागात आहे. या भागातील १६ मतदान केंद्र संवेदनशील आणि ११ मतदान केंद्र अतिसंवेदनशील ठरविण्ययात आले आहेत. या मतदान केंद्रावर सुरक्षा विभागाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल. प्रत्येक केंद्रावर पोलीस कमांडो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. तसेच दरेकसा, पिपरीया आणि बिजेपार या तिन्ही ठिकाणी सशस्त्र दुरस्थ क्षेत्र (एओपी) असून या भागातील सर्व मतदान अधिकारी त्यांच्या सुरक्षेत राहतील आणि त्यांना मतदान केंद्रावर नेण्यात येईल.