लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभे करणाºया वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेलटोलीच्या रेल्वे स्टेशन रस्त्यावर एमएच ३५/३०३७ या वाहनाला आरोपी संतोष छोटेलाल उके (५०) रा. कटंगी बुध्द विहाराजवळ गोंदिया याने उभे करुन ठेवले. काटी येथे एमएच ३५/के-२४८८ या वाहनाला अनिलकुमार जगदिश अंबुले (२९) रा. गिरोला याने उभे करुन ठेवले होते. तसेच आॅटो क्र.एमएच ३५/के-४२९६ ला गजेंद्र रामू नेवारे (२६) रा. बाजारटोला याने उभे करुन ठेवले होते. चिचगड येथील बसस्थानकावर आॅटो एमएच ३१/सीव्ही-७६७४ ला आरोपी लतीफ अब्दुल रज्जाक शेख (३१) रा. चिचगड याने, आॅटो एमएच ३५/२९२६ या वाहनाला मोहसीन आसीखा पठाण (२९) रा. देवरी याने, देवरीच्या नगरपंचायत इमारतीसमोर काळी पिवळी एमएच ३५/२५९१ ला आरोपी शैलेश उमाशंकर तिवारी(३९) रा.देवरी याने, देवरीच्या बसस्थानकावर एमएच ३५/३४४४ या वाहनाला वाहन चालक अरविंद भागवत ब्राम्हणकर (२७) रा. दुर्गुटोला याने, एमएच ३६/३२२७ ला या वाहनाला चंदू जगन ब्राम्हणकर (३५) रा.साखरीटोला, राधीका हॉटेलसमोर एमएच ३५/२६०१ या आॅटोला आरोपी विनोद दुलीचंद राऊत (२८) देवरी याने, सालेकसा बसस्थानकावर मेटाडोर एमएच ३५/६२१ ला आरोपी प्रदीप हिवराज शेंडे (२८) रा.मुरपार याने, कावराबांध बसस्थानकावर एमएच ३५/४१३८ या वाहनाला मुकेश फुलीचंद लिल्हारे(२९) रा. मुंडीपार याने,गोंदियाच्या गांधी प्रतिमासमोर आॅटो एमएच ३५/एएच-००२३ या वाहनाला प्रथम जितेंद्र मेश्राम (२९) रा. गोंदिया याने, काटी येथे एमएच २०/डीई-००६५ या वाहनाला यशवंतराव दशरथ नागपुरे(३३) रा. लहीटोला याने, कामठा चौक आमगाव येथे एमएच ३५/एएच-०२७६ या वाहनाला धनराज मयाराम चकोले (४३) रा. सालेकसा याने, परसवाडा येथे एमएच ३५/३१४४ या वाहनाला रुपेश लंकेश्वर मेश्राम (३०) रा. तिरोडा याने, एमएच ३५/२७१७ या वाहनाला अविनाश प्रेमलाल बापीसताले (४०) रा. चांदोरी याने, जुबेद युसूफ कुरैशी (२८) याने एमएच ३५/एएच-०३१६ या वाहनाला, घोसीटोला येथे एमएच ३५/३००५ या वाहनाला लोकराम दयाराम पारधी (५०) रा.घोसीटोला याने, हरदोली बसस्थानकावर आॅटो एमएच ३५/१५१० या वाहनाला आरोपी रियाज बाबा खान पठाण (४०) रा. गोरेगाव याने,सालेकसा बसस्थानकावर ट्रक एमएच ३५/जी-६३७४ या वाहनाला आरोपी भैसारे(३५)रा. सालेकसा याने, शेंडा चौक सडक-अर्जुनी येथे एमएच ३५/३३७२ या वाहनाला जितेंद्र हिरामन चुटे(३२) रा. बाम्हणी याने धोकादायक स्थितीत वाहन उभे करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तक्रारीवरुन सदर आरोपीविरुध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यावर धोकादायक वाहने चालविणाऱ्यांंवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 9:36 PM