शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सुधारित शेतीत सडक अर्जुनी ‘नंबर वन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:14 PM

जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुका सुधारीत शेतीकडे वळल्याने पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याचे मुख्य धानपिक हे होते. पण परंपरागत शेतीत बदल करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शनात राहून शेतकऱ्यांनी शेतीत पिकविलेला टरबूज विदेशात, भेंडी छत्तीसगड राज्यात....

ठळक मुद्देशेतकरी वळले बागायतीकडे : टरबूज गेला विदेशात

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुका सुधारीत शेतीकडे वळल्याने पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याचे मुख्य धानपिक हे होते. पण परंपरागत शेतीत बदल करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शनात राहून शेतकऱ्यांनी शेतीत पिकविलेला टरबूज विदेशात, भेंडी छत्तीसगड राज्यात तर इतर भाजीपाला मोठ मोठ्या शहरात बाजारपेठेत जायला लागला आहे.मागील वर्षभरापासून सडक-अर्जुनीचे तालुका कृषी अधिकारीपद रिक्त आहे. अर्जुनी-मोरगावचे कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम यांच्याकडे अतिरीक्त कारभार आहे. सडक-अर्जुनीचे मंडळ कृषी अधिकारीचे पद रिक्त आहे. सडक-अर्जुनीचे कृषी पर्यवेक्षक सी.एस.आकरे यांच्याकडे अतिरीक्त प्रभार आहे.अतिरीक्त प्रभारातही सडक-अर्जुनी तालुका नंबर वन आहे. तांत्रीक कृषी अधिकारी रोषणा कोराम हे आहेत. दुसरे कृषी पर्यवेक्षक मनोज भालाधरे आहेत.तालुक्यात ठिकठिकाणी ११ कृषी सहायक आहेत. त्यातही एका कृषी सहाय्यकाकडे १० ते १२ गावे आहेत. १० ते १२ गावांची धुरा सांभाळून शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी मार्गदर्शन होत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी कोहळी येथील अ‍ॅपल बोर जिल्ह्यात विकली गेली. डाळींबाचा पहिला प्रयोग सिंदीपार गावात करण्यात आला. त्यात शंकर लंजे, मुनेश्वर कापगते, डॉ. दिलीप कापगते (चिचटोला) यांनी यशस्वी करुन दाखविला. गोंदिया जिल्ह्यात डाळींबाच्या शेतीचा एकमेव प्रयोग सिंदीपार चिचटोला येथेच घेण्यात आला.सडक-अर्जुनी तालुक्यात सुधारीत शेती चिचटोला, सिंदीपार, घाटबोरी, कोकणा जमींदारी, खोडशिवनी, रेंगेपार, चिखली, राका, तिडका, फुटाळा, डव्वा, कोसमतोंडी, सौंदड, सहाकेपार, जांभळी येथे केली जात आहे. सध्या तालुक्यात ११०४ हेक्टर आर क्षेत्रात उसाची लागवड केली आहे. तर ५०.०९ हेक्टर आर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. भाजीपाला २५९ हेक्टर आर क्षेत्रात लावण्यात आला आहे. भेंडींची सर्वात जास्त लागवड राका गावात करण्यात आली आहे. विविध पिकांना ठिंबक सिंचनाचा वापर करुन सुधारीत शेती करीत आहेत. सेंद्रीय खताचे माध्यमातून भरघोस उत्पन्न कसे घेता येतो. याचे प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर दिला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील एकूण शेतीपैकी सिंचनाखाली येणारे क्षेत्र १० हजार ७०१ हेक्टर आर क्षेत्र आहे. तालुक्यातील शेतकºयांचा कल इतर पिकांकडे वाढत आहे.१६६ शेतकऱ्यांना रोटाव्हेटरउन्नत शेती-समृध्द शेतकरी योजनेंतर्गत कृषी अभियांत्रीकी औजारे वाटप करण्यात येते. यात ट्रॅक्टर, रोटाव्हेटर १६६ वाटप करण्यात आले. शतकोटी वृक्ष लागवड १०० हेक्टर आर क्षेत्रात लावण्यात आले. ठिंबक तुषार सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील १४० शेतकºयांना लाभ देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भातखाचर पुनरूज्जीवन, बोडी, नूतनीकरण आदी कामे झाली आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत पॅक हाऊस-२, मल्चींग ६५ हेक्टर आर क्षेत्रात देण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाडे टाकी (गांडूळ खत) तयार केले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी