लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना कोणतेही मस्टर न काढता व बाहेरील मजूर लावून काम करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाच्या कामात गिट्टी, मुरुम या साहित्याची रॉयल्टी न काढता विना रॉयल्टीने यात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या कामात मुरूमाऐवजी विहिरीतील मलमा वापरण्यात आला. निकृष्ट दर्जाचे साहित्त्य वापरुन रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आल्याने अल्पावधीत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाºया वाहन चालकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. या कामावर बांधकाम साहित्य टाकण्याचे व घोटाई करण्याचे काम एका कंत्राटदाराला पेटी कंत्राट पध्दतीने देण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामे करताना गावातील मजुरांना प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र ग्रामपंचायतने या कामावर बाहेरील मजूर लावून गावातील मजुरांना कामापासून वंचित ठेवले. या कामात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावातील मजुरांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसीलदार गोरेगाव व गटविकास अधिकारी पं.स. गोरेगाव यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे.नाल्यावरील बांधकामावर प्रश्नचिन्हमहाजनटोला- नवाटोला या रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्यावर सिंमेटचे बांधकाम करायचे होते. तसेच सिमेंट क्रांकीटचे बेस तयार करण्याची गरज होती. मात्र तसे न करता मातीवरच क्रांकीट टाकण्यात आले. पावसाळ्यात दरवर्षी या नाल्याला पूर येतो. तसेच शालेय विद्यार्थी सुध्दा याच नाल्यावरुन ये-जा करतात. निकृष्ठ बांधकामामुळे पावसाळ्यात नाल्यावरील बांधकाम वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल परिसरातील गावकºयांनी उपस्थित केला आहे.
रस्ता खडीकरणाच्या कामात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:36 PM
गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना कोणतेही मस्टर न काढता व बाहेरील मजूर लावून काम करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
ठळक मुद्देबांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर : सीईओंकडे तक्रार