लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहर आणि अतिक्रम हे जणू समीकरणच तयार झाले आहे. त्यामुळेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले आहे. तर गोरेलाल चौकात सकाळच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा आॅटोची रांग लागलेली असते. त्यामुळे या परिसरातील रस्ते अघोषित पार्किंग स्थळ झाले आहेत.वाहतूक नियंत्रण विभाग व नगर परिषदेने शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प करीत शहरात दहा दिवसांपूर्वीअतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली होती. शहरातील नेहरु चौक, गांधी प्रतिमा, पोलीस स्टेशन रोड, रेल्वे स्थानक, रामनगर, पाल चौक, जयस्तंभ चौकात ही मोहीम चार ते पाच दिवस राबवून अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे ही मोहीम सातत्याने राबविली जाईल अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र ही मोहीम सुध्दा पुन्हा बंद करण्यात आल्याने आधीच्या अतिक्रमण हटाव मोहीम सारखीच ही सुध्दा इतिहास जमा झाली आहे. परिणामी या दोन्ही विभागाने रस्त्यावरील हटविलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्याऐवजी त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांची समस्या कायम असून या दोन्ही विभागावर व्यावसायीक वरचढ झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक आणि गोरेलाल चौकातील मुख्य रस्त्यावर सकाळी ८ वाजतापासून रस्त्याच्या दुतर्फा आॅटो उभे करुन ठेवलेले असतात. त्यामुळे हा रस्ता म्हणजे आॅटो चालकांसाठी अघोषीत पार्किंग स्थळच झाल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या दुतर्फा आॅटो उभे करुन ठेवले जात असल्याने वाहन चालक आणि पादचारी नागरिकांना सुध्दा याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा सर्व प्रकार वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलीस शिपायांना माहिती असून सुध्दा ते याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष होण्यामागे नेमके ‘कोणते कारण’आहे हे मात्र समजण्यापलिकडे आहे. वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद अधे मधे अतिक्रमण हटाव मोहीम राबवून हे दोन्ही विभाग अतिक्रमणाच्या समस्येबाबत जागृत असल्याचे दाखविते. मात्र शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण पुन्हा जैसे थे होत असल्याने आता या मोहीमवर सुध्दा शहरवासीयांचा विश्वास राहिलेला नाही.गोरेलाल चौकातील अतिक्रमणांकडे दुर्लक्षवाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने संयुक्तपणे शहरातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र गोरेलाल चौकात रस्त्याच्या दुतर्फा काही बड्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेले असताना हेअतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या चौकातील अतिक्रमणाची समस्या कायम आहे.अतिक्रमण हटाव मोहीमेला वांरवार ब्रेक काशहरात बराच कालावधीनंतर पंधरा दिवसांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर ती मध्येच थांबविण्यात आली. ही मोहीम मध्येच बंद झाल्यानंतर नागरिकांची ओरड वाढली. त्यानंतर पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. आता पुन्हा ही मोहीम बंद करण्यात आली. त्यामुळे वांरवार या मोहीमेला ब्रेक का असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.पोलीस अधीक्षक घेणार का दखलशहरातील वाढत्या अतिक्रमणाची समस्येची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरूवात केली. त्यामुळे शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त होतील अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र ही मोहीम सुध्दा आधीच्या मोहीमेसारखीच नाममात्र ठरल्याने पुन्हा रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे झाले आहे.त्यामुळे याची पोलीस अधीक्षक दखल घेणार का असा सवाल केला जात आहे.
गोरेलाल चौकातील रस्ते झाले अघोषित पार्किंगस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:53 PM
गोंदिया शहर आणि अतिक्रम हे जणू समीकरणच तयार झाले आहे. त्यामुळेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले आहे. तर गोरेलाल चौकात सकाळच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा आॅटोची रांग लागलेली असते. त्यामुळे या परिसरातील रस्ते अघोषित पार्किंग स्थळ झाले आहेत.
ठळक मुद्देपुन्हा गुंडाळली अतिक्रमण हटाव मोहीम : वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई केवळ नावापुरती