याप्रसंगी रमाकांत खोब्रागडे, कामगार अधिकारी तथा पालक अधिकारी भारती कोसरे, सेवानिवृत्त शिक्षक जे. टी. भगत उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा अभियान केवळ नावापुरते न राहता या सर्व चालक - वाहक, अभियानातून सर्वच प्रवासी व रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी तथा वाहन चालकांनी रस्ता सुरक्षासंबंधी असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांचे जीव जात असल्याने रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले स्वतःचे आपल्या परिवाराचे अपघातापासून रक्षण करणे गरजेचे आहे. एस. टी.चे चालक, वाहकांनी तसेच यांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एस. टी.ची सर्व वाहने सुस्थितीत असल्याची खात्री करून चालवावी. जिथे बसस्थानक नाहीत, अशा ठिकाणी वाहन उभे करताना सुरक्षित जागेतच वाहन थांबवून प्रवाशांची चढउतार करावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अनमोल वडोले यांनी केले. रोशन नखाते यांनी आभार मानले.
रस्ता सुरक्षा जीवन रक्षा मोहिमेला सुरुवात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:26 AM