शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 9:07 PM

ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्रीराम हे महान होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हनुमान घडले. श्रीरामामुळेच हनुमान मोठे झाले.

ठळक मुद्देनाना पटोले : बकी-मेंडकी येथे भागवत कथा सप्ताह, सभागृहाचे लोकार्पण

ऑनलाईन लोकमतपांढरी : ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्रीराम हे महान होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हनुमान घडले. श्रीरामामुळेच हनुमान मोठे झाले. त्यामुळे रामायणामध्ये ज्याप्रमाणे रामाला कोणताही त्रास हनुमानाने होऊ दिला नाही. त्याच हनुमानाच्या भूमिकेत आजचा लोकप्रतिनिधी हा आपल्या जनता जनार्दन म्हणून प्रभू श्रीरामाविषयी समर्पित असणे तेवढेच महत्वाचे आहे. अन्यथा त्याला हनुमानाच्या भूमिकेत राहण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी केले. ते सडक-अर्जुनी तालुक्यातील बकी (मेंडकी) येथे त्यांच्याच खासदार निधीतून तयार करण्यात आलेल्या सभा मंडपाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.पटोले म्हणाले, जनतेमुळे लोकप्रतिनिधी मोठमोठे पद उपभोगतात. पण जेव्हा जनतेच्या समस्या सोडविण्याचा विषय येतो तेव्हा नेता आपल्या खुर्चीच्या मोहापायी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देतात. अशा लोकप्रतिनिधींना जनतेने येणाऱ्या काळात धडा शिकविणे तितकेच महत्वाचे असल्याचे सांगत जनतेने नेहमी जागृत राहण्याचे आवाहन केले.या वेळी हनुमान मंदिराच्या प्रांगणात संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने भंडारा जिल्हा को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जागेश्वर धनभाते, उपाध्यक्ष ईश्वर कोरे, माजी सभापती राजेश नंदागवळी, युवक काँग्रेसचे महासचिव निशांत राऊत, डॉ. बबन कांबळे, चिखलीचे सरपंच सुधाकर कुर्वे, पद्माकर नेवारे, रेशमा मोटघरे, धर्मादास शहारे, इशन शिवणकर, समितीचे अध्यक्ष ग्यानीराम मारवाडे, उपाध्यक्ष रामदास बागडे व समितीचे सदस्य उपस्थित होते. कथा व प्रवचन हभप कविता उपरीकर महाराज नागपूर यांच्या वाणीतून सादर झाली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले