लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेताच्या बांधावरील व शेतातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी वृक्ष संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेशंन देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेमुळे वृक्षांचे संवर्धन करुन वृक्षतोड कमी करण्यास मदत झाली. आता या योजनेची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्यासाठी या योजनेचा अभ्यास करण्यासाठी शासनाने आठ सदस्यीय समिती गठीत केली आहे.गोंदिया जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. वनसंपदा देखील विपुल असून अनेक दुर्मिळ आणि औषधीयुक्त वनस्पतींचा यात समावेश आहे. तसेच शंभर दीडशे वर्षे जुनी वृक्ष आहेत. तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि बांधावर सुध्दा वृक्षांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात होते. तर वृक्षतोड देखील केली जात होती.त्यामुळे अनेक दुर्मिळ वृक्ष आणि वनस्पती नष्ट होत होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शेतातील व रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष पेशंन योजना सुरू केली.वृक्षांचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती वृक्ष वर्षाकाठी १ हजार रुपये पेशंन देण्यास सुरूवात केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील हजारो वृक्षांना दत्तक घेऊन त्यांचे संवर्धन करण्यास सुरूवात केली. या योजनेला व्यापक प्रतिसाद मिळाल्यानंतर काळे यांनी ही योजना २०१७-१८ या वर्षांत अधिक प्रभाविपणे राबविली.या मोहीमेचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर याची आता राज्य शासनाने सुध्दा दखल घेतली आहे.गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या योजनेचा अभ्यास करुन त्याची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. ही समिती गोंदिया जिल्ह्यात या योजनेचा अभ्यास करणार आहे.वृक्षतोडीचे परवाने मागणाऱ्यांच्या संख्येत घटजुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वृक्ष पेशंन योजना सुरू केल्यानंतर शेतातील वृक्ष तोडीचे परवाना मागणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचा अहवाल वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दिला आहे.त्यामुळे जुन्या वृक्षांचे संवर्धन करणे शक्य झाले.वृक्ष संवर्धनामुळे या गोष्टींची मदतवृक्ष संवर्धनामुळे वृक्षांच्या पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करता येते. स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे संवर्धन करणे शक्य होते.जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. वृक्षांपासून फळे आणि अन्न सुध्दा मिळते.त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे ही बाब तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांनी पटवून दिली.वृक्षांसाठी पेशंन अभिनव उपक्रमजिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीचा अभास केला. या दरम्यान त्यांना जिल्ह्यात अनेक वर्षे जुनी वृक्ष असून त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळले. त्यांनी हीच बाब हेरुन या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पेशंन योजना सुरू केली. हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात चांगलाच गाजला होता.सार्वजनिक वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हाजिल्ह्यातील अवैध वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी त्यांनी विविध उपाय योजना केल्या होता. सार्वजनिक वृक्षांची कत्तल करणाऱ्यावर त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती. देवरी आणि गोंदिया तालुक्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा सुध्दा दाखल करण्यात आला होता.
वृक्षसंवर्धनाची योजना ठरणार राज्यात रोलमॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 8:37 PM
शेताच्या बांधावरील व शेतातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी वृक्ष संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेशंन देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेमुळे वृक्षांचे संवर्धन करुन वृक्षतोड कमी करण्यास मदत झाली.
ठळक मुद्देआठ सदस्यीय समिती गठित : जिल्ह्याचा करणार अभ्यास, सर्वत्र होणार अंमलबजावणी