शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

विद्युततारा कोलमडल्याने रोवणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:55 AM

गेल्या १५ दिवसांपासून खापरी परिसरात विद्युततारा शेतात कोलमडल्याने शेतकरी भीतीपोटी रोवणी करण्यास विलंब करीत आहेत.

१५ दिवस लोटले : वीज वितरण महामंडळाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गेल्या १५ दिवसांपासून खापरी परिसरात विद्युततारा शेतात कोलमडल्याने शेतकरी भीतीपोटी रोवणी करण्यास विलंब करीत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खापरी परिसरात गेल्या १५ दिवसांपूर्वी विद्युत खांब तुटल्याने विद्युततारा शेतात लोंबकळत आहेत. काही तारा शेतातच पसरल्या आहेत. ज्यावेळी विद्युततारा लोंबकळल्या तेव्हा तातडीने वीजपुरवठा खंडीत केल्याने अनर्थ टळला. ही बाब वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती असूनही ते याकडे कानाडोळा करीत आहेत. अर्जुनी-मोरगाव ते खापरी या रस्त्यावर सुध्दा तारा तुटून पसरल्या आहेत. याच रस्त्याने परिसरातील शेतकरी दैनंदिन ये-जा करतात. विद्युत तारांमध्ये प्रवाह नसला तरी शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे. सध्या रोवणीचा हंगाम सुरु आहे. शेतमालक व मजूरवर्गामध्ये या तारांची भीती असल्याने रोवणीची कामे खोळंबली आहेत. सध्या पावसाने डोळे वटारले. त्यामुळे मोटरपंपावर आधारित असलेले शेतकरी विद्युत प्रवाह बंद असल्याने रोवणीपासून वंचित आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करुन वीजप्रवाह नियमित सुरु करावा, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.