लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी येथे विविध सोयी सुविधांचा अभाव आहे. परिणामी येथे उपचारासाठी येणाऱ्या जिल्हाभरातील रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. तर सीटी स्कॅनसह आवश्यक यंत्र सामुग्रीअभावी गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.याकडे आ.विनोद अग्रवाल यांनी शासनाचे लक्ष वेधल्यानंतर सीटी स्कॅन मशीनसह ११ कोटी रुपयांची यंत्रसामुग्री दाखल झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त वैद्यकीय उपकरण उपलब्ध झाले आहेत. सर्जरी विभागात एक अल्ट्रॉसोनिक मशीन तर ६ वेंटिलेटर, कॉर्डलेस अल्ट्रॉसोनिक मशीन, एक जनरेटर, ३ पार्ट लायझर मशीन, ईसीजी मशीन, व्हेंटिलेशन पंप, १ आॅटोमेटेड एचपीएलसी सिस्टम मशीन आणि एक आॅटोमेटेड ब्लड कल्चर मशीन यांचा समावेश आहे. महिन्याभरात सिटीस्कॅन करिता नवीन वातानुकुलित रूमचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यात अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन लागणार आहे. येत्या मार्चपर्यंत उर्वरित यंत्रसामग्री उपलब्ध होऊन रुग्णांना होणाºया समस्या आणि त्रास कमी होणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वैद्यकीय मशिनीचा ताफा रुग्णसेवेत झाल्याने रुग्णांना योग्य त्या सुविधा वेळेत मिळणे शक्य होणार आहे.या व्यतिरिक्त विविध रक्त तपासण्या, रक्ताचे संकलन, विभाजन करणे, सोनोग्राफी करणे, हृदयरोगासंबंधी तपासण्या सहजरित्या करणे शक्य होणार आहे.२२ लाख रुपये विविध चाचण्यांत आवश्यक द्रव्यांसाठी उपलब्ध झाल्याने चाचण्यांसाठी लागणारे रसायन उपलब्ध होणार आहे. रुग्णांना विविध चाचण्यासाठी येणाºया समस्या सुद्धा आता दूर होणार आहेत. रसायन व अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या अभावाने रु ग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. तर आर्थिक भूर्दंड सुध्दा बसत होता.मात्र आ. विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्याने अत्याधुनिक यंत्रसामग्री व रसायने उपलब्ध झाली आहे. येत्या मार्चपर्यंत सर्व यंत्रसामग्री इंस्ट्रॉल होऊन सेवा प्रारंभ होणार आहे. या सर्व सुविधांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
११ कोटीची अत्याधुनिक यंत्रसामुग्री मेडिकलमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:18 AM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त वैद्यकीय उपकरण उपलब्ध झाले आहेत. सर्जरी विभागात एक अल्ट्रॉसोनिक मशीन तर ६ वेंटिलेटर, कॉर्डलेस अल्ट्रॉसोनिक मशीन, एक जनरेटर, ३ पार्ट लायझर मशीन, ईसीजी मशीन, व्हेंटिलेशन पंप, १ आॅटोमेटेड एचपीएलसी सिस्टम मशीन आणि एक आॅटोमेटेड ब्लड कल्चर मशीन यांचा समावेश आहे.
ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय होणार दूर : विनोद अग्रवाल यांनी वेधले होते लक्ष